रेल्वे मंत्रालय

दलाली हालचाली शोधून त्यांच्या विरुद्ध कारवाई करण्यासाठी आरपीएफचे देशव्यापी प्रयत्न सुरु

20 मे 2020 रोजी मोहिमेला सुरुवात

दलालांना शोधून त्यांच्याविरुद्ध कारवाई करण्यासाठी देशव्यापी प्रयत्न सुरु

प्रबल (PRABAL) मॉड्यूल द्वारे ग्राउंड इंटेलिजेंससह पीआरएस डेटाचे विश्लेषण

आयआरसीटीच्या 8 एजंटसह 14 दलालांना अटक करण्यात आली आणि त्यांच्याकडून 636727 रुपयांची तिकिटे जप्त केली

Posted On: 21 MAY 2020 9:38PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 21  मे 2020

 

12 मे 2020 रोजी भारतीय रेल्वेने वातानुकुलीत गाड्यांच्या 15 जोड्या (30 गाड्या) सुरु केल्या आणि 1 जून 2020 पासून अतिरिक्त गाड्यांच्या 100 जोड्या (200 गाड्या) चालवणार असल्याची घोषणा केल्यापासून या विशेष गाड्यांमध्ये अनेक वैयक्तिक कल्पनांचा वापर करून ई-तिकिटांच्या आरक्षणामध्ये गोंधळ होत असल्याच्या अनेक तक्रारी प्राप्त झाल्या आहेत.

21 मे 2020 रोजी या 100 जोड्यांच्या गाड्यांचे आरक्षण सुरू झाल्यावर या दलालांमुळे सामान्य लोकांना मिळणाऱ्या रेल्वेच्या आरक्षणाच्या उपलब्धतेवर विपरीत परिणाम होईल, अशी भीतीही व्यक्त करण्यात आली आहे.

वरील बाबींच्या अनुषंगाने, आरपीएफने या दलाली हालचाली शोधून त्याविरुद्ध कारवाई करण्यासाठी देशव्यापी प्रयत्न सुरु केले आहेत. ग्राउंड इंटेलिजेंससह एकत्रित केलेल्‍या प्रबल (PRABAL) मॉड्युलद्वारे पीआरएस (PRS) डेटाचे विश्लेषण करुन त्‍याचा वापर या दलालांना ओळखण्यासाठी आणि त्‍यांना पकडण्‍यासाठी केला जातो.

20 मे 2020 रोजी ही मोहीम सुरू करण्यात आली आणि देशाच्या पूर्वेकडील भागात अम्फान चक्रीवादळाच्या दुष्परिणामांनंतरही आरपीएफला आयआरसीटीसीच्या 8 एजंट्ससह 14 दलालांना अटक करण्यात यश आले आणि त्यांच्याकडून अजून प्रवास सुरु न झालेल्या गाड्यांची 636727/- (सहा लाख छत्तीस हजार सातशे सत्तावीस रुपये) रुपयांची तिकिटे जप्त करण्यात आली. आयआरसीटीसी एजंट्स वैयक्तिक आयडीचा वापर करून तिकिटांचे आरक्षण करत होते आणि नंतर अनधिकृतपणे अधिक किंमतीला या तिकिटांची विक्री करतात. त्यांना काळ्या यादीत टाकण्यासाठी कारवाई सुरू केली आहे. सुपर तत्काळ प्रो नावाचे सॉफ्टवेअरचा वापर करून एका दलालाला शोधण्यात आले.

 

B.Gokhale/S.Mhatre/P.Malandkar

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1625908) Visitor Counter : 157