सुक्ष्म, लघु आणि मध्यम उदयोग मंत्रालय

सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्री नितीन गडकरी तंत्रज्ञानाच्या अद्ययावतीकरण व कोविड नंतरच्या परिस्थितीचा सामना करण्यासाठी परदेशी गुंतवणुकीला आकर्षित करण्यासाठी  कार्यरत

Posted On: 20 MAY 2020 5:21PM by PIB Mumbai

 

केंद्रीय सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योग तसेच रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योग (एमएसएमई) क्षेत्राला तंत्रज्ञानाच्या अद्ययावतीकरणाविषयी विचार करण्याचे आणि कोविड नंतरच्या परिस्थितीचा सामाना करण्यासाठी परदेशी गुंतवणुकीला आकर्षित करण्याचे आवाहन केले आहे. ते म्हणालेपंतप्रधानांनी एमएसएमई क्षेत्रासाठी जाहीर केलेल्या मदत पॅकेजचा उपयोग मध्यम व लघु उद्योगांनी पुन्हा जोमाने कार्यान्वित होण्यासाठी केला पाहिजे. आज नागपूर येथून फरीदाबाद उद्योग संघटना आणि मटेरियल्स रीसायकलिंग असोसिएशन ऑफ इंडियाच्या सदस्यांना दोन वेगवेगळ्या व्हिडीओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून संबोधित करताना मंत्री म्हणाले की, हे पॅकेज स्थानिक देशांतर्गत उद्योगांना नवीन संजीवनी प्रदान करेल.

गडकरी म्हणाले की, अर्थमंत्र्यांनी जाहीर केलेले प्रोत्साहन पॅकेज एमएसएमई क्षेत्राला मोठ्याप्रमाणात उपयुक्त ठरेल. 31 मार्च पर्यंत 6 लाख एमएसएमईची पुनर्रचना करण्यात आली असून 31 डिसेंबर पर्यंत यात अजून 25 लाख जोडले जातील, अशी माहिती त्यांनी दिली. अन्य निधी जोडून 10 हजार कोटी रुपयांचा निधी 50 हजार कोटी रुपयांच्या निधीपर्यंत मजबूत केला जाईल. 

एमएसएमईची तरलता समभाग बाजारपेठेशी जोडण्याबाबतही मंत्री बोलले. ते म्हणाले, शेअर बाजाराच्या मजबुतीकरणामध्ये 7.5 टक्के हिस्स्यासह चांगले मुल्यांकन प्राप्त करणाऱ्या एमएसएमईना सरकार पाठबळ प्रदान करेल. ते म्हणाले सर्व एमएसएमई ची थकबाकी 45 दिवसांच्या आत वितरीत करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. गडकरी यांनी सांगितले की, त्यांनी मोठ्या उद्योगाला देखील असे करण्याची विनंती केली आहे. मंत्रालयाच्या समाधान पोर्टलने एमएसएमईना 40 हजार कोटी रुपये वितरीत करण्यात मदत केली आहे, अशी माहिती त्यांनी दिली. ते म्हणाले, मोठ्या उद्योगांना पुरवठा करण्याच्या आधारे अशा युनिट्सला कर्ज उपलब्ध करुन देण्याची योजना आणण्याचा विचार आहे.

एमएसएमई क्षेत्राची व्याख्या बदलल्या बद्दल मंत्री खूप खुश झाले. या क्षेत्रात गुंतवणूकीची मर्यादा वाढविल्यास या उद्योगाला चांगली चालना मिळेल, ज्यामुळे आता बँकांकडून सुलभ वित्त मिळू शकेल. या क्षेत्राकडून दीर्घकाळ या दुरुस्तीची मागणी केली जात होती, असे ते म्हणाले. त्याचप्रमाणे जागतिक निविदा मानदंडात सुलभता आणणे ही एक उल्लेखनीय पायरी आहे, असे ते म्हणाले.

गडकरी यांनी उद्योग प्रतिनिधींना एकत्र येण्याचे आणि जमीन दर कमी असलेल्या प्रस्तावित दिल्ली-मुंबई हरित द्रुतगती मार्गाच्या आसपास औद्योगिक क्लस्टर तयार करण्याचा विचार करण्यासंदर्भात आवाहन केले. ते म्हणाले की अशा सर्व प्रस्तावांसाठी मार्ग खुले आहेत आणि उद्योगांना त्या दिशेने मदत करतील.

***

S.Pophale/S.Mhatre/P.Kor

***

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1625492) Visitor Counter : 416