आर्थिक व्यवहार विषयक मंत्रिमंडळ समिती
"हिंदुस्थान ऑरगॅनिक केमिकल्स लिमिटेड", कंपनीला व्याज माफी देण्याच्या प्रस्तावाला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी
प्रविष्टि तिथि:
20 MAY 2020 2:17PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 20 मे 2020
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील वित्तीय व्यवहारविषयक मंत्रिमंडळ समितीच्या आज झालेल्या बैठकीत, 'हिंदुस्थान ऑरगॅनिक केमिकल्स लिमिटेड (HOCL) या कंपनीच्या सरकारी कर्जावरील 7.59 कोटी रुपयांचे, 31 मार्च 2005 पर्यंत व्याज माफ करण्याच्या प्रस्तावाला एक्स पोस्ट फॅक्टो (ex post facto) मंजुरी देण्यात आली.
सीसीईए च्या मार्च 2006 मध्ये झालेल्या बैठकीत HOCL ला देण्यात आलेल्या पुनर्वसन पैकेजमध्ये 31 मार्च 2005 पर्यंतच्या दंडात्मक व्याज आणि व्याजावरील व्याजाला माफी देण्यात आली होती, त्याव्यतिरिक्तच्या व्याजाला आज झालेल्या बैठकीत माफी देण्यात आली आहे.
ही जवळपास 10 वर्षे जुनी घटना असल्यामुळे, व्याजाची 7.59 कोटी रुपये रक्कम आधीच सरकारी कर्ज खात्यातून तसेच HOCL च्या व्यवहारातून सोडून देण्यात आली आहे. त्यावरील व्याज देखील किरकोळ आहे. त्यामुळे आता या टप्प्यावर, हे व्याज माफ करून नियमित करुन घेणेच व्यवहार्य आणि श्रेयस्कर ठरणार आहे.या व्याजमाफीमुळे HOCL ला या बाबतीतल्या कॅगच्या निरीक्षणावर तोडगा काढून पुढे जाता येणार आहे.
R.Tidke/R.Aghor/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(रिलीज़ आईडी: 1625344)
आगंतुक पटल : 216