रेल्वे मंत्रालय
भारतीय रेल्वेने 19 दिवसात “श्रमिक विशेष” गाड्यांनी 21 लाखांहून अधिक प्रवाशांना त्यांच्या मूळ राज्यात परत पाठवत आणखी एक महत्वाचा टप्पा केला पार
भारतीय रेल्वेने देशभरात 19 मे 2020 पर्यंत (संध्याकाळी 4 पर्यंत) 1595 “श्रमिक विशेष” गाड्या चालविल्या
प्रवाशांना मोफत अन्न आणि पाण्याची सोय
Posted On:
19 MAY 2020 9:10PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 19 मे 2020
देशाच्या विविध भागात अडकलेले स्थलांतरित मजूर, यात्रेकरू, पर्यटक, विद्यार्थी आणि इतर व्यक्तींना विशेष रेल्वेने आपल्या मूळ गावी परत जाता यावे याबाबत केंद्रीय गृह मंत्रालयाच्या आदेशानंतर रेल्वेने श्रमिक विशेष गाड्या चालवण्याचा निर्णय घेण्यात आला होता.
19 मे 2020 पर्यंत (संध्याकाळी 4 पर्यंत) देशाच्या विविध राज्यातून 1592 “श्रमिक विशेष” गाड्या चालवण्यात आल्या आहेत. 21 लाखांहून अधिक प्रवासी त्यांच्या मूळ राज्यांमध्ये पोहोचले आहेत.
या 1595 गाड्या आंध्र प्रदेश, बिहार, चंदीगड केंद्र शासित प्रदेश, दिल्ली, गोवा, गुजरात, हरियाणा, झारखंड, कर्नाटक, केरळ, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, पुडुचेरी केंद्रशासित प्रदेश, पंजाब, राजस्थान, ओडिशा, तमिळनाडू, तेलंगणा, त्रिपुरा, उत्तर प्रदेश, उत्तराखंड, पश्चिम बंगाल या राज्यांमधून सोडण्यात आल्या आहेत.
तसेच, या श्रमिक विशेष गाड्यांनी उत्तरप्रदेश, बिहार, राजस्थान, पश्चिम बंगाल, छत्तीसगड, झारखंड, हिमाचल प्रदेश, जम्मू आणि काश्मीर, मणिपूर, मिझोरम, ओदिशा, तामिळनाडू, तेलंगणा, त्रिपुरा, उत्तराखंड, पंजाब, जम्मू आणि काश्मीर अशा अनेक राज्यांत आपला प्रवास पूर्ण केला आहे.
गाडीत बसण्यापूर्वी प्रवाश्यांची तपासणी सुनिश्चित करण्यात येते. प्रवासादरम्यान प्रवाश्यांना मोफत भोजन आणि पाणी पुरविले जाते.
* * *
B.Gokhale/S.Mhatre/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1625218)