रेल्वे मंत्रालय
स्थलांतरितांना सुरक्षित आणि जलद घरी पोहोचवण्यासाठी देशभरातल्या सर्व जिल्ह्यांना जोडणा-या श्रमिक विशेष गाड्या चालवण्याची भारतीय रेल्वेची तयारी
अडकलेले मजूर आणि त्यांच्या गंतव्यस्थानाची सूची बनवून राज्य नोडल अधिका-यांमार्फत रेल्वेकडे अर्ज करण्याविषयी रेल्वे आणि वाणिज्य आणि उद्योग मंत्र्यांचे सर्व जिल्हाधिका-यांना निर्देश
दररोज जवळपास 300 श्रमिक विशेष गाड्या चालवण्याची भारतीय रेल्वेची क्षमता
ठिकठिकाणी अडकलेल्या स्थलांतरित श्रमिकांना त्यांच्या गृहराज्यात सुखरूप पोहोचवण्यासाठी सुविधा
Posted On:
16 MAY 2020 9:12PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 16 मे 2020
स्थलांतरितांना त्यांच्या घरी सुखरूप पोहोचवण्यासाठी भारतीय रेल्वेने देशातल्या सर्व जिल्ह्यांना जोडणा-या रेल्वे गाड्या चालवण्याची तयारी केली आहे.
ठिकठिकाणी अडकलेले मजूर आणि त्यांच्या गंतव्यस्थानाची सूची बनवून राज्य नोडल अधिका-यांमार्फत रेल्वेकडे अर्ज करण्याविषयी रेल्वे आणि वाणिज्य आणि उद्योग मंत्र्यांनी सर्व जिल्हाधिका-यांना आज निर्देश दिले.
भारतीय रेल्वेकडे दररोज जवळपास 300 श्रमिक विशेष गाड्या चालवण्याची क्षमता आहे. मात्र सध्या निम्म्याहूनही कमी क्षमतेचा वापर केला जात आहे.
रेल्वे संपूर्ण क्षमतेचा वापर करून अडकलेल्या श्रमिक प्रवाशांना आपआपल्या गृहजिल्ह्यांपर्यंत सोडण्यास तयार आहे. त्या त्या जिल्ह्यांची वास्तविक गरज लक्षात घेवून, त्या भागात श्रमिक विशेष गाड्या सोडण्यास रेल्वे खाते सज्ज आहे.
आत्तापर्यंत रेल्वेने 15 लाखांपेक्षा जास्त स्थलांतरित प्रवाशांना त्यांच्या गृहराज्यांमध्ये पोहोचवले आहे. यासाठी जवळपास 1150 श्रमिक विशेष गाड्या सोडण्यात आल्या आहेत. सध्या जितके स्थलांतरित मजूर रोज प्रवास करत आहेत, त्यापेक्षा दुप्पट संख्येने मजूर दररोज प्रवास करू शकतील, इतकी भारतीय रेल्वेची क्षमता आहे.
कोणत्या जिल्ह्यामध्ये किती परप्रांतीय श्रमिक जावू इच्छितात, कोणाला कोणत्या जिल्ह्मध्ये जायचे आहे, याची माहिती मिळाली तर, त्या अनुषंगाने त्या त्या जिल्ह्यांपर्यंत जाणा-या गाड्या सोडणे, भारतीय रेल्वे खात्याला शक्य होणार आहे, असंही रेल्वे मंत्र्यांनी यावेळी सांगितले.
M.Jaitly/S.Bedekar/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1624637)
Visitor Counter : 196