आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय
कोविड-19 संसर्गजन्य रुग्णांचे प्रमाण जास्ती असणाऱ्या 30 महानगरपालिका क्षेत्रांशी आरोग्य सचिवांनी साधला संवाद
कोविड-19 प्रतिबंधात्मक आणि व्यवस्थापन उपाययोजनांचा घेतला आढावा
बरे होणाऱ्यांचे प्रमाण वाढून 35.09 टक्के
Posted On:
16 MAY 2020 9:50PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 16 मे 2020
आरोग्य सचिव प्रीती सुदान आणि आरोग्य मंत्रालयाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसह आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाचे विशेष कार्य अधिकारी राजेश भूषण यांनी देशातील कोविडग्रस्त रुग्णांपैकी 80 टक्के प्रमाण असलेल्या 30 महानगरपालिका क्षेत्रातील आरोग्य सचिव, पालिका आयुक्त, जिल्हाधिकारी,आणि इतर अधिकाऱ्यांसोबत उच्चस्तरीय आढावा बैठक घेतली.
ही महानगरपालिका क्षेत्रे पुढील राज्ये / केंद्रशासित प्रदेशातील आहेतः महाराष्ट्र, तामिळनाडू, गुजरात, दिल्ली, मध्य प्रदेश, पश्चिम बंगाल, राजस्थान, उत्तर प्रदेश, तेलंगणा, आंध्र प्रदेश, पंजाब आणि ओदिशा .
कोविड -19 प्रकरणांच्या व्यवस्थापनासाठी अधिकारी आणि महानगरपालिकांच्या कर्मचार्यांनी केलेल्या उपायांचा आढावा घेण्यात आला. शहरी वस्त्यांमध्ये कोविड -19 च्या व्यवस्थापनाविषयी नवीन मार्गदर्शक सूचना केल्या जात आहेत. या धोरणाच्या ठळक मुद्द्यांवर यावेळी चर्चा झाली. जिल्ह्यांमधील कोविड -19 संक्रमणाच्या सद्यस्थितीबद्दल सादरीकरण केले गेले. उच्च जोखमीचे घटक, पुष्टीकरण दर, मृत्यूचे प्रमाण, दुप्पट दर, दर दशलक्ष चाचण्या इत्यादी घटक यावेळी निर्देशित केले गेले. प्रतिबंधात्मक आणि बफर झोन मधील नोंद ठेवताना लक्षात घेण्यासारख्या घटकांची माहिती यावेळी देण्यात आली. प्रतिबंधात्मक क्षेत्रात अनिवार्य गोष्टी म्हणजे परीघ नियंत्रण, घरोघरी जाऊन शोध घेणे, संपर्कात आलेल्यांची नोंद ठेवणे, चांचणी नियम, सक्रिय प्रकरणांचे प्रयोगशाळेतील व्यवस्थापन. बफर झोनमध्ये पाळत ठेवण्याचे काम जसे की एसएआरआय / आयएलआय प्रकरणांची देखरेख ठेवणे, सुरक्षित अंतर सुनिश्चित करणे, हात स्वच्छतेस प्रोत्साहन देणे इत्यादि.
हे ठळकपणे सांगण्यात आले की रुग्णांचे आणि संपर्काचे प्रमाण, भौगोलिक क्षेत्र आणि अंमलबजावणी यासारख्या घटकांवर आधारित सामान्यत: प्रतिबंधात्मक विभागाला परिभाषित केले जावे. महानगरपालिका, निवासी वसाहत / मोहल्ला / महानगरपालिका प्रभाग किंवा पोलिस स्टेशन-क्षेत्र / महानगरपालिका क्षेत्र / शहरे इत्यादी आवश्यकतेनुसार प्रतिबंधात्मक क्षेत्र म्हणून नामित केल्या जाऊ शकतात. जिल्हा प्रशासनाने / स्थानिक नागरी संस्थेने स्थानिक पातळीवरील तांत्रिक माहितीसह या भागाचे योग्य वर्णन केले पाहिजे, असा सल्ला देण्यात आला. प्रतिबंधात्मक क्षेत्रासह सभोवतालच्या बफर झोनमध्ये प्रसारण साखळी खंडित करण्यासाठी देखील निर्दिष्ट केले जाणे आवश्यक आहे. जुनी शहरे, शहरी झोपडपट्ट्या आणि इतर उच्च लोकसंख्या घनतेच्या विभागांसह परप्रांतीय कामगारांच्या छावण्यांमध्ये उच्च दक्षता आणि देखरेख ठेवणे शहरी भागातील कोविड -19 च्या व्यवस्थापनात महत्त्वाचे पाऊल आहे.
प्रतिबंधात्मक क्षेत्रात बाधितांचे प्रमाण दुप्पट होणे, उच्च मृत्यू दर आणि उच्च पुष्टीकरण टक्केवारी यासारख्या निर्देशकांच्या व्यवस्थापनासंदर्भात, त्यांना संभाव्य मूळ कारणांबद्दल माहिती देण्यात आली आणि संभाव्य कृती करण्याबाबत सूचना देण्यात आल्या. हे देखील अधोरेखित केले गेले की विशेषत: दाट लोकवस्ती असलेल्या शहरी भागात सामाजिक-आर्थिक परिस्थिती, मर्यादित आरोग्याची पायाभूत सुविधा, सुरक्षित अंतराचा अभाव, स्त्रियांना भेडसावणाऱ्या समस्या इत्यादी आव्हानांचा विचार करणे आवश्यक आहे.
आरोग्य सचिवांनी यावरही भर दिला की कोविड -19 प्रकरणांच्या नियंत्रण आणि व्यवस्थापनाबरोबरच माता आणि नवजात शिशूंची काळजी, कर्करोगाचा उपचार, क्षयरोग संदर्भात पाळत ठेवणे, लसीकरण प्रयत्न, कीटक नियंत्रण उपाय यासारख्या शहरी भागातील सर्व आवश्यक आरोग्य सेवा पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर सुरु असल्याची खात्री करावी. श्रद्धा व आत्मविश्वास वाढविण्यासाठी महापालिका क्षेत्रांना प्रभावी जोखीम संप्रेषणावर लक्ष केंद्रित करण्यास सांगण्यात आले. स्थानिक समुदायांकडून सहकार्य करण्यास प्रोत्साहित करण्यासाठी स्थानिक पाळत ठेवणाऱ्या पथकांसमवेत येऊ शकणारे समुदाय नेते आणि स्थानिक यांनी पुढाकार घेऊन सहभागी होण्यासाठी त्यांना विनंती केली गेली. विशेषत: झोपडपट्टीतील लोकांना प्रोत्साहन देण्यासाठी सरकारच्या प्रयत्नांना पाठिंबा देणारे लोक या स्थानिक समुदायातील वडीलधाऱ्या व्यक्ती आणि प्रभाग अधिकाऱ्यांसमवेत काम करणारे नेते होते असे मुंबईच्या अधिकाऱ्यांनी यावेळी सांगितले. स्थानिक उपाय शोधण्यात, विश्वास निर्माण करण्यास आणि आरोग्य कर्मचाऱ्यांवर सकारात्मक प्रभावासाठी समुदायाच्या नेतृत्वाची भूमिका अधोरेखित केली गेली.
आजारातून बरे होणाऱ्यांची टक्केवारी, एसएआरआय / आयएलआयवर पाळत ठेवणे आणि अधिक प्रभावी मनुष्यबळ व्यवस्थापन सुधारण्यासाठी रूग्णांचा वेळेवर माग काढण्याकडे लक्ष देणे आवश्यक असल्याचेही यावेळी सांगण्यात आले. सर्व आरोग्य सेवा प्रदात्यांना पुरेशी संरक्षणात्मक संसाधने प्रदान करणे आवश्यक आहे, असा सल्ला देण्यात आला. मदत व अलगीकरण छावण्यांचे स्वच्छताविषयक मापदंड पाळणे,कोविड -19 रुग्ण असणाऱ्या घरांमधील कचरा व्यवस्थापनावरही जोर देण्यात आला.
आतापर्यंत एकूण 30,150 लोक बरे झाले आहेत. गेल्या 24 तासांत 2233 रुग्ण बरे असल्याचे आढळले. यामुळे बरे होणाऱ्यांचे प्रमाण 35.09 टक्के झाले आहे. आता पुष्टी झालेल्या एकूण रुग्णांची एकूण संख्या 85,940 आहे. कालपासून, भारतात कोविड -19 आजाराची नोंद झालेल्या प्रकरणांमध्ये 3970 ची वाढ झाली आहे.
कोविड -19 संबंधित तांत्रिक मुद्द्यांविषयी, मार्गदर्शक तत्त्वे आणि सल्लागारांविषयीच्या अधिकृत आणि अद्ययावत माहितीसाठी कृपया नियमितपणे येथे भेट द्याः https://www.mohfw.gov.in/ आणि @MOHFW_INDIA.
कोविड -19 संबंधित तांत्रिक शंका निरसन करण्यासाठी technicalquery.covid19[at]gov[dot]in आणि इतर शंका ncov2019[at]gov[dot]in आणि @CovidIndiaSeva.यावर पाठवू शकता.
कोविड -19 संदर्भात काही प्रश्न असल्यास कृपया आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाशी संपर्क साधा. : + 91-11-23978046 या हेल्पलाईन क्रमांकावर किंवा 1075 (टोल फ्री) क्रमांकावर. कोविड -19 संदर्भात राज्ये / केंद्रशासित प्रदेशांच्या हेल्पलाईन क्रमांकाची यादी https://www.mohfw.gov.in/pdf/coronvavirushelplinenumber.pdf यावर देखील उपलब्ध आहे.
* * *
G.Chippalkatti/V.Joshi/D.Rane
(Release ID: 1624560)
Visitor Counter : 253