गृह मंत्रालय
केंद्रीय अर्थमंत्र्यांनी आज जाहीर केलेल्या रचनात्मक सुधारणा उपाययोजनांची केंद्रीय गृहमंत्र्यांनी केली प्रशंसा
मजबूत, सुरक्षित आणि सशक्त भारत हे मोदी सरकारचे सर्वोच्च प्राधान्य - अमित शहा
पंतप्रधान मोदींचा ‘रिफॉर्म ,परफॉर्म आणि ट्रान्सफॉर्म’ हा मंत्र गेल्या 6 वर्षात भारताच्या अभूतपूर्व विकासाची गुरुकिल्ली - गृहमंत्री
प्रविष्टि तिथि:
16 MAY 2020 9:42PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 16 मे 2020
केंद्रीय अर्थमंत्र्यांनी आज जाहीर केलेल्या रचनात्मक सुधारणा उपाययोजनांची प्रशंसा करताना केंद्रीय गृहमंत्री अमित शहा म्हणाले, "आजच्या महत्त्वपूर्ण निर्णयांबद्दल मी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांचे आभार मानतो. या निर्णयांमुळे आपल्या अर्थव्यवस्थेला नक्कीच चालना मिळेल आणि आत्मनिर्भर भारताच्या दिशेने आपल्या प्रयत्नांना बळ मिळेल.” पंतप्रधान मोदींचा 'रिफॉर्म, परफॉर्म आणि ट्रान्सफॉर्म' हा मंत्र गेल्या 6 वर्षात भारताच्या अभूतपूर्व विकासाची गुरुकिल्ली आहे, असेही ते म्हणाले.
कोळसा उत्पादनात भारताला स्वावलंबी बनवण्याच्या अभूतपूर्व निर्णयाबद्दल पंतप्रधान मोदींचे अभिनंदन करताना शाह म्हणाले, "कोळसा क्षेत्रात पायाभूत सुविधांच्या विकासासाठी 50,000 कोटी रुपये आणि व्यावसायिक खाणकामाची सुरुवात ही एक स्वागतार्ह धोरणात्मक सुधारणा आहे जी अधिक स्पर्धा आणि पारदर्शकता आणेल."
"संरक्षण उत्पादनात थेट परकीय गुंतवणुकीची मर्यादा 74 टक्क्यांपर्यंत वाढवणे आणि निवडक शस्त्रे / प्लॅटफॉर्मच्या आयातीवर वर्षनिहाय मुदतीसह बंदी घातल्यामुळे निश्चितपणे 'मेक इन इंडिया' ला चालना मिळेल आणि आपला आयातीवरचा बोजा कमी होईल.” एक मजबूत, सुरक्षित आणि सक्षम भारत हे मोदी सरकारचे सर्वोच्च प्राधान्य आहे असे गृहमंत्री म्हणाले.
विमान वाहतूक क्षेत्राला चालना देण्यासाठी दूरगामी निर्णय घेतल्याबद्दल पंतप्रधान मोदींचे शाह यांनी आभार मानले. ते म्हणाले, "एअर स्पेसच्या वापरावरील निर्बंध शिथिल केल्यामुळे आपल्या विमान वाहतूक क्षेत्राला वर्षाकाठी सुमारे 1000 कोटी रुपयांचा फायदा होईल. तसेच भारताला एअरक्राफ्ट एमआरओचे जागतिक केंद्र बनविण्याचेसाठी एमआरओ करप्रणालीचे सुसूत्रीकरण करण्यात आले. "
अंतराळ आणि सामाजिक पायाभूत सुविधा विकास क्षेत्रात खासगी क्षेत्राचे अस्तित्व वाढवण्याच्या निर्णयाबद्दल बोलताना गृहमंत्री म्हणाले, "सामाजिक पायाभूत विकासात खासगी क्षेत्राच्या गुंतवणूकीला चालना देण्यासाठी 8100 कोटी रुपयांच्या सुधारित व्हाएबिलिटी गॅप फंडिंग प्रदान करणे आणि भारताच्या अंतराळ प्रवासात खासगी क्षेत्राला सह प्रवासी बनवण्यासाठी अंतराळ उपक्रमांमध्ये खासगी सहभागाला प्रोत्साहन देण्याच्या आजच्या निर्णयाबद्दल मी पंतप्रधान मोदींचे कौतुक करतो."
* * *
G.Chippalkatti/S.Kane/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(रिलीज़ आईडी: 1624559)
आगंतुक पटल : 202