गृह मंत्रालय

बंगालच्या उपसागरात घोंघावत असलेल्या चक्रीवादळाच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी कॅबिनेट सचिवांच्या अध्यक्षतेखाली एनसीएमसीची बैठक

Posted On: 16 MAY 2020 9:24PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 16 मे 2020


बंगालच्या उपसागरात  घोंघावत असलेल्या चक्रीवादळाच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी कॅबिनेट सचिव राजीव गौबा यांच्या अध्यक्षतेखाली राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन समितीची (एनसीएमसी) बैठक आज झाली.

भारतीय हवामान शास्त्र विभागाने माहिती दिली की बंगालच्या उपसागरामध्ये तयार झालेला कमी दाबाचा पट्टा अधिक तीव्र होऊन त्याचे चक्रीवादळात रूपांतर होण्याची शक्यता आहे आणि  20 मे 2020 पर्यंत ते ओदिशा आणि पश्चिम बंगालची किनारपट्टी ओलांडण्याची शक्यता आहे. वेगवान वाऱ्यासह मुसळधार  ते अतिमुसळधार पाऊस आणि भरतीच्या लाटा येण्याची शक्यता आहे.

बैठकीत संबंधित राज्य सरकारच्या अधिकार्यां नी चक्रीवादळामुळे उद्भवणार्‍या कोणत्याही परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी सज्ज असल्याचे सांगितले. तसेच राज्य सरकारांनी मच्छीमारांना समुद्रात जाऊ नये असा इशारा दिला आहे. 

चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर निवाऱ्याची सोय करण्यात आली असून लोकांना सुरक्षित स्थळी नेण्यासाठी आवश्यक परिसराची पाहणी करण्यात आली आहे.

एनडीआरएफ, सशस्त्र दल आणि भारतीय तटरक्षक दल यांना सतर्क करण्यात आले असून ते राज्य सरकारच्या अधिकाऱ्यांशी समन्वय साधत आहेत. त्यांनी सर्व तयारीचा स्वत: आढावा घेतला आहे. गृह मंत्रालय  राज्य सरकारे आणि संबंधित संस्थांच्या सतत संपर्कात आहे.

कॅबिनेट सचिवांनी सद्य परिस्थिती आणि बचाव तसेच मदत कार्याच्या तयारीचा आढावा घेतला आणि आवश्यकतेनुसार तातडीने मदत उपलब्ध करुन देण्याचे निर्देश दिले.

या बैठकीला गृह, संरक्षण मंत्रालयांचे वरिष्ठ अधिकारी तसेच आयएमडी, एनडीएमए आणि एनडीआरएफचे अधिकारी उपस्थित होते. बैठकीत व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे राज्य सरकारचे मुख्य सचिव आणि  अन्य वरिष्ठ अधिकारी सहभागी झाले होते. 

 

* * *

B.Gokhale/S.Kane/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1624552) Visitor Counter : 108