रसायन आणि खते मंत्रालय

इंडिया पोटॅश लिमिटेड मुरिएटच्या किंमतीत वरून 17500 रुपये मे टन पर्यंत कपात करणार

Posted On: 15 MAY 2020 11:44PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 15 मे 2020


इंडिया पोटॅश लिमिटेडने (आयपीएल)  मुरिएट ऑफ पोटॅशच्या  सध्याच्या 19000 रुपये प्रति मे.टन किंमतीत 17500 रुपये मे. टन पर्यंत म्हणजेच 75 रुपये प्रति बॅग कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. हा निर्णय 18 मे 2020 पासून अमलात येईल.

 मुरिएट ऑफ पोटॅश ज्याला पोटॅशियम क्लोराईड असे देखील म्हणतात, हे वनस्पतीची वाढ आणि गुणवत्ता यासाठी आवश्यक आहे. प्रथिने आणि साखरेच्या निर्मितीमध्ये ते महत्त्वपूर्ण भूमिका बजावते. हे झाडांमधील पाण्याचे प्रमाण कायम राखून दुष्काळी स्थितीत संरक्षण करते जे या फोटोसिंथेसिस साठी उपयुक्त असते कारण पाने त्यांचा आकार आणि जोम टिकवून ठेवतात.

गेल्या एक वर्षात अमेरिकी डॉलरच्या तुलनेत भारतीय रुपया लक्षणीयरित्या घसरुनही आणि एमओपीवरील सरकारी अनुदानामध्ये 1 एप्रिल 2020 पासून  604 रुपये प्रति मे टन  कपात होऊनही शेतकऱ्यांसाठी किमती कमी केल्याचे कंपनीने म्हटले आहे.

इंडिया पोटॅश  लिमिटेड (आयपीएल) चे व्यवस्थापकीय संचालक डॉ पी एस गहलौत म्हणाले की आमचा पूर्ण विश्वास आहे की या निर्णयामुळे खतांचा समतोल वापर होईल जेणेकरून खतावरील शेतकर्‍यांचा खर्च कमी होईल आणि कृषी उत्पादनात वाढ होईल. यातून सरकारचे उद्दिष्ट देखील साध्य होईल. कंपनी नेहमीच खतांच्या वैज्ञानिक आणि न्याय्य वापराला प्रोत्साहन देण्याच्या बाजूने आहे असे ते म्हणाले. 

केंद्रीय रसायने आणि खत मंत्री डी व्ही सदानंद गौडा यांनी डॉ पी एस गहलौत यांचे आणि आयपीएलच्या व्यवस्थापनाचे अभिनंदन केले.काळाची गरज ओळखून त्यांनी शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी मोठे पाऊल टाकल्याचे ते म्हणाले.  "कोविड -१९ या कालावधीत एमओपीच्या किंमतीत कपात केल्यामुळे शेतकऱ्यांना  विशेषत: अल्पभूधारक आणि अल्प प्रमाणात शेती असलेल्या शेतकऱ्यांना मोठा फायदा होईल. कमी खर्चामुळे कृषी उत्पादन वाढेल आणि शेतकऱ्यांचे उत्पन्न देखील वाढेल."असे ते म्हणाले .


* * *

M.Jaitly/S.Kane/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1624443) Visitor Counter : 378