विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालय

आयएनएईने आयएनएई युवा उद्योजक पुरस्कार 2020 साठी नामांकन मागवली

प्रविष्टि तिथि: 15 MAY 2020 11:39PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 15 मे 2020


विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागाची (डीएसटी) स्वायत्त संस्था असलेल्या इंडियन नॅशनल अकादमी ऑफ इंजिनीअरिंग (आयएनएई), गुडगाव, या संस्थेने आयएनएई युवा  उद्योजक पुरस्कार 2020 साठी नामांकन मागवली आहेत. दोन लाख रुपये रोख आणि प्रमाणपत्र असे पुरस्काराचे स्वरूप असून निवड झालेल्या व्यक्तीला  किंवा तीन व्यक्तींपेक्षा जास्त सदस्य नसलेल्या व्यक्तीच्या समूहाला विभागून दिला जाईल.

एका वर्षात दोन उमेदवारांना देण्यात येणारा हा पुरस्कार युवा अभियंत्यांमधील नाविन्य आणि उद्योजकतेला प्रोत्साहित करण्यासाठी आणि त्यांच्या कामाला ओळख मिळवून देण्यासाठी स्थापन करण्यात आला आहे. नवीन प्रक्रियेत किंवा उत्पादनांमध्ये उद्योगात प्रत्यक्षात साकार झालेली आणि अंमलात आणलेली अभियांत्रिकी संशोधन आणि संकल्पना यांना प्राधान्य असेल आणि 1 जानेवारी 2020 रोजी वयाची 45 वर्षे पूर्ण केलेले वर्षांपेक्षा जास्त वयाचे भारतीय नागरिक विचारात घेण्यास पात्र आहेत.

नावीन्य आणि उद्योजकता या दोन्ही बाबी विचारात घेतल्या जातील आणि शैक्षणिक / संशोधन संस्था किंवा उद्योगातील युवा संशोधक ज्यांच्या अभिनव अभियांत्रिकी / तंत्रज्ञान कल्पना यशस्वी स्टार्ट-अप उपक्रमांमध्ये परिवर्तित करतील त्यांना प्राधान्य दिले जाईल.

आयएनएई  युवा उद्योजक पुरस्कार 2020 साठी संस्थेने आयएनएईशी संबंधित लोकांना नामांकन पाठवण्यासाठी पत्र पाठवले आहे. या व्यतिरिक्त, 29 आयआयटी रिसर्च पार्क्स खेरीज विविध सरकारी संस्थाच्या  मदतीने चालणाऱ्या देशभरातील 372 इनक्युबेशन सेंटर आणि स्टार्ट-अप कडूनही नामांकने मागविण्यात आली आहेत, डीएसटीच्या मदतीने चालणारे इनक्यूबेटर, राष्ट्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान उद्योजकता विकास मंडळाच्या (एनएसटीईडीबी) अंतर्गत इनक्यूबेटर, बायोटेक्नॉलॉजी विभाग (डीबीटी) द्वारा सहाय्य मिळणारे इन्क्यूबेटर, इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान विभाग (डीआयटीवाय)कडून सहाय्य मिळणारे इनक्यूबेटर, सूक्ष्म,  लघु आणि मध्यम उद्योग (एमएसएमई) अंतर्गत इनक्यूबेटर आणि मनुष्य बळ विकास मंत्रालयाकडून (एमएचआरडी) सहाय्य मिळणारे इनक्यूबेटर यांचा यात समावेश आहे. नामांकने मागवण्याव्यतिरिक्त मे 2020 च्या सीआयआय कम्युनिकच्या अंकात एक जाहिरातही प्रसिद्ध करण्यात आली आहे.

आयएनएईच्या संकेतस्थळावर नामनिर्देशनपत्रे संदर्भात माहिती असून नामांकन पाठ्वण्याची अंतिम तारीख 30 जून 2020 आहे. इच्छुक उमेदवार अधिक माहितीसाठी http://www.inae.in/ वर भेट देऊ शकतात. 


* * *

B.Gokhale/S.Kane/D.Rane
 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(रिलीज़ आईडी: 1624390) आगंतुक पटल : 189
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: Telugu , English , Urdu , हिन्दी , Bengali , Punjabi , Tamil