कृषी मंत्रालय

ई-नाम पोर्टलशी 38 नव्या मंडया जोडल्या

Posted On: 15 MAY 2020 8:15PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 15  मे 2020

भारतभरातील 38 कृषी उत्पन्न  बाजारपेठा  ई-नाम पोर्टलशी आज जोडल्या गेल्या असून त्यायोगे एकूण 415 कृषीउत्पन्न बाजारपेठा जोडल्या जाण्याचा नियोजित टप्पा गाठला गेला आहे.  यात मध्यप्रदेश(19),तेलंगणा(10), महाराष्ट्र (4),याबरोबर गुजरात,हरयाणा,पंजाब,केरळ आणि जम्मू काश्मिरमधील प्रत्येकी (1) अशा एकूण 38 बाजारपेठांचा समावेश आहे .

पहिल्या टप्प्यात 585 आणि आता दुसऱ्या टप्प्यात नव्या 415 मंडया जोडल्या गेल्याने आता 18 राज्ये आणि तीन केंद्रशासित प्रदेश मिळून आता एकूण 1000 बाजारपेठांचा या पोर्टलमध्ये समावेश झाला आहे .

-नाम पोर्टल हे छोट्या कृषीउत्पन्न व्यापारी संघटनानी ( SFAC) अनुसरल्यामुळे तसेच त्याला सर्व राज्ये  आणि , के़ंद्रशासित प्रदेशातील पणनमंडळे, बाजारपेठांतील सचिव ,देखरेखतज्ञ, दर्जा मानक तज्ञ, वजन करणारे, सेवापुरवठादार, शेतकरी, व्यापाऱ्यांनी स्विकारल्यामु़ळे भारत सरकारच्या कृषी आणि शेतकरी विकास मंत्रालयाअंतर्गत येणारे सर्वात मोठे पोर्टल बनले आहे.

नॅशनल ग्रीकल्चर मार्केट (e-NAM ) इलेक्ट्रॉनिक पोर्टलचे उद्‌घाटन 14 एप्रिल 2016 रोजी पंतप्रधान  नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले होते ,वन नेशन वन  मार्केट  असा कृषीमालाच्या विक्री साठी   संपूर्ण देशभरात एकच  सामायिक मंच  असावा या उद्देशाने याची स्थापना झाली होती.

 

B.Gokhale/S.Patgaonkar/P.Malandkar

 

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1624179) Visitor Counter : 213