राष्ट्रपती कार्यालय

खर्चात कपात करून राष्ट्रपती भवनाने घालून दिला आदर्श


कोविड-19 लढ्याला मदत म्हणून राष्ट्रपती भवनातील साधनांचा योग्य वापर करून आत्मनिर्भर भारत चळवळीत सहभाग

Posted On: 14 MAY 2020 5:00PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 14  मे 2020

 

कोविड-19 च्या मदत उपाययोजनांमध्ये अधिक स्त्रोत उपलब्ध व्हावेत या विचाराने, राष्ट्रपती राम नाथ कोविंद यांनी मार्च महिन्यात ‘पीएम केअर्स फंड’ला आपले एक महिन्याचे वेतन दिल्यानंतर आता वार्षिक वेतनातील 30 टक्के भागही देण्याचा निर्णय घेतला आहे.

याशिवाय राष्ट्रपती भवनामध्ये वापरात असलेल्या साधनांचा योग्य वापर करून खर्चात कपात करत आदर्श घालून देण्याच्या सूचना राष्ट्रपतींनी दिल्या आहेत. यातून वाचलेले पैसे कोविड 19चा मुकाबला तसेच भारतीय जनतेची आर्थिक दुर्बलता दूर कण्यासाठी वापरला जावा, अशा सूचना देण्यात आल्या आहेत. राष्ट्रपतींच्या दृष्टिकोनातून हे एक छोटे पण आत्मनिर्भर भारतासाठी महत्वपूर्ण सहाय्य आहे. यातून कठीण काळात आपल्याला आव्हान स्वीकारण्याचे बळ तसेच विकास व समृद्धीच्या प्रवासात देशाला ताकद मिळेल.

राष्ट्रपती भवन खालील उपाययोजनांचा अवलंब करणार आहे:

  1. आर्थिक वर्ष 2020-21 मध्ये कोणतीही नवीन भांडवली कामे हाती घेतली जाणार नाहीत. केवळ सुरू असलेली कामे पूर्ण केली जातील.
  2. केवळ संपत्तीच्या जतनाचा विचार करूनच दुरुस्ती व देखभालीची कामे करण्यात येतील.
  3. पर्यावरणपूरक कार्यालयीन कामे करताना कागद, इंधन व विजेचा वापर कमी करण्यात येईल.
  4. समारंभ प्रसंगी वापरण्यात येणारे राष्ट्रपती वाहन व इतर गोष्टी यांची खरेदी टाळण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यासाठी राष्ट्रपती भवन व सरकारकडे उपलब्ध असलेल्या साधनांचा वापर करण्यात येईल.
  5. खर्च कपात व सद्य परिस्थितीमध्ये आवश्यक शारीरिक अंतर जपण्यासाठी देशांतर्गत कार्यक्रम व प्रवास कमी केले जाणार. त्याऐवजी तंत्रज्ञानाची मदत घेऊन जनतेपर्यंत पोहचणार.
  6. राष्ट्रपती भवनातील विशेष समारंभप्रसंगी साधनांचा वापर कमी करण्यात येईल, त्यासाठी:
  • शारीरिक अंतर राखण्यासाठी पाहुण्यांची संख्या कमी ठेवण्यात येईल.
  • सजावटीसाठी वापरण्यात येणाऱ्या फुलांचा तसेच इतर गोष्टींचा कमीतकमी वापर करण्यात येईल.
  • भोजनातील पदार्थ शक्य तितके कमी ठेवले जातील.  

यामुळे येत्या आर्थिक वर्षात राष्ट्रपती भवनाच्या एकूण वार्षिक खर्चातील जवळपास 20 टक्के खर्च वाचेल, असे अनुमान आहे.

सोबतच, या गोष्टीचीही काळजी घेतली जाईल की यामुळे कंत्राटी/बाहेरून घेतलेल्या कर्मचाऱ्यांना दिल्या गेलेल्या आधारावर काही दुष्परिणाम होणार नाही. शिवाय राष्ट्रपती भवनाने गरीब जनतेच्या कल्याणासाठी हाती घेतलेल्या उपक्रमांचाही या लोकांवर दुष्परिणाम होणार नाही.  

 

B.Gokhale/S.Pophale/P.Malandkar

 

 

 

 

 

 

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1624022) Visitor Counter : 235