सुक्ष्म, लघु आणि मध्यम उदयोग मंत्रालय

MSME मंत्रालयातर्फे www.Champions.gov.in या ‘चॅम्पियन्स’ पोर्टलचे उद्‌घाटन
तंत्रज्ञान आधारित नियंत्रण कक्ष-व्यवस्थापन आणि माहिती व्यवस्था

आधुनिक ICT साधनांवर आधारित नियंत्रण कक्षाचे नेटवर्क एक-केंद्र आणि विविध शाखीय मॉडेल विकसित

भारतीय लघुउद्योगांना राष्ट्रीय आणि जागतिक चॅम्पियन्स च्या स्पर्धेसाठी सहाय्य करण्याचे उद्दिष्ट

Posted On: 12 MAY 2020 3:35PM by PIB Mumbai

नवी दिल्ली,  12  मे 2020

केंद्रीय सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्रालयाने एक मोठा उपक्रम हाती घेत, www.Champions.gov.inया चॅम्पियन्स पोर्टलचे आज उद्‌घाटन केले. हे एक तंत्रज्ञान आधारित नियंत्रण कक्ष आणि व्यवस्थापन माहिती व्यवस्था असलेले पोर्टल आहे. या व्यवस्थेत आधुनिक टूल्स चा उपयोग करण्यात आला असून त्याचे उद्दिष्ट भारतातील सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांना राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर चॅम्पियन्स  होण्यास मदत करणे हे आहे.

या पोर्टलमधल्या चॅम्पियन्सचा अर्थ आहे-- क्रियेशन अँड हार्मोनियस अप्लिकेशन ऑफ मॉडर्न प्रोसेस फॉर इन्क्रीझिंग द आऊटपुट अँड नैशनल स्ट्रेंथ (The CHAMPIONS). म्हणजेच राष्ट्रीय उत्पादन आणि ताकद वाढवण्यासाठी एका आधुनिक प्रक्रिया असलेल्या सुलभ अप्लिकेशनची निर्मिती.  

या नावावरूनच लक्षात येते की हे पोर्टल छोट्या उद्योगांना व्यापक बनवण्यात येणारे अडथळे दूर करणे, त्यांना पाठींबा आणि आवश्यक ती मदत करणे, प्रोत्साहन देणे या उद्दिष्टपूर्तीसाठी तयार करण्यात आले आहे. MSME मंत्रालयाशी निगडीत सर्व समस्यांसाठी या पोर्टलवरुन समाधान मिळू शकेल.

सध्याच्या कठीण काळात, आपल्याला MSME उद्योगाना आधार मिळावा यासाठी ICT आधारित व्यवस्था लावली जाणार आहे, असे संकेत एमएसएमई विभागाचे सचिव ए के शर्मा यांनी दिले होते. त्यानुसार, 9 मे 2020 रोजी हे चॅम्पियन्स पोर्टल सुरु करण्यात आले.

ही एक तंत्रज्ञान आधारित नियंत्रण कक्ष व्यवस्थापन माहिती व्यवस्था आहे. ICT ची उपरकरणे, जसे टेलिफोन, इन्टरनेट, व्हिडीओ कॉन्फरन्स याच्या व्यतिरिक्त, कृत्रिम बुद्धीमत्ता, डेटा विश्लेषण आणि मशीन लर्निंग च्या माध्यमातून देखील हे पोर्टला वापरले जाऊ शकते. संपूर्ण ICT संरचना ही NIC च्या मदतीने तयार करण्यात आली आहे.

या व्यवस्थेचा भाग म्हणून हा नियंत्रण कक्ष हब एंड स्पोक पद्धती म्हणजे एककेंद्रीकृत विविध शाखा असलेल्या पद्धतीने बनवण्यात आले आहे. याचे केंद्र मुख्यालय नवी दिल्लीत आहे. तर त्याच्या विविध शाखा, विविध राज्यातली कार्यालये आणि संस्थांमध्ये राहतील. आतापर्यंत, या व्यवस्थेचा भाग म्हणून विविध राज्यात 66 नियंत्रण कक्ष सथापन करण्यात आले आहेत. 

9 मे रोजी शर्मा यांनी या पोर्टलची चाचणी घेतली. यावेळी देशातील 120 लोकेशन्स व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे जोडली गेली होती. या विभागांना आणि या क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांना या पोर्टलचा मोठा लाभ होईल, अशी आशा, शर्मा यांनी व्यक्त केली.   

 

M.Jaitly/R.Aghor/P.Malandkar

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai@gmail.com(Release ID: 1623262) Visitor Counter : 70