Posted On:
11 MAY 2020 6:52PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 11 मे 2020
कृषी विपणन बळकट करण्यासाठी आणि शेतकऱ्यांना त्यांचा कृषी मालाची ऑनलाईन पोर्टल द्वारे विक्री करता यावी यासाठी केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्री नरेंद्रसिंह तोमर यांनी आज 177 नव्या मंडी अर्थात कृषी माल बाजारपेठा, राष्ट्रीय कृषी मार्केट ई- नाम शी जोडल्या. महाराष्ट्रातल्या 54, गुजरातमधल्या 17,हरियाणा-26, जम्मू काश्मीर-1, केरळ-5, ओदिशा-15, पंजाब-17, राजस्थान-25, तामिळनाडू-13, आणि पश्चिम बंगाल मधली 1 मंडी आज जोडण्यात आली.आज 177 आणखी मंडी जोडल्या गेल्याने देशात ई नाम मंडीची संख्या आता 962 झाली आहे.
शेतकऱ्यांना अधिक लाभ व्हावा यासाठी ई नाम दृढ करण्यासाठी प्रयत्न हवेत असे तोमर यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे या नव्या मंडी सुरु करताना सांगितले. शेतकऱ्यांच्या फायद्यासाठी तंत्रज्ञानाचा महत्वाकांक्षी वापर व्हावा या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कल्पनेतून ई नाम पोर्टल साकारले आहे असे तोमर म्हणाले.
याआधी 17 राज्ये आणि 2 केंद्र शासित प्रदेशातल्या 785 मंडी ई नामशी जोडण्यात आल्या आहेत त्यामुळे याच्या वापरकर्त्या शेतकऱ्यांची संख्या 1.66 कोटी, व्यापाऱ्यांची संख्या 1.30 लाख तर कमिशन एजंटची संख्या 71,911 झाली होती. 9 मे 2020 पर्यंत एकूण 3.43 कोटी मेट्रिक टन आणि 37.93 लाख बांबू आणि नारळ असा एकत्रित 1 लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त व्यापार ई नाम मंचावर झाला आहे. 708 कोटी रुपयांचे डिजिटल पेमेंट ई नाम मंचा द्वारे झाले असून त्याचा 1.25 लाखाहून जास्त शेतकऱ्यांना लाभ झाला आहे. ई नाम मुळे मंडी आणि राज्यांच्या सीमे बाहेरही व्यापार सुलभपणे करता येतो. 12 राज्यातल्या 236 मंडी आंतर मंडी व्यापारात तर 13 राज्ये/केंद्र शासित प्रदेश आंतर राज्य व्यापारात सहभागी झाली असून त्यामुळे शेतकऱ्यांना त्यांच्यापासून लांब असलेल्या व्यापाऱ्यांशी थेट संवाद शक्य सध्या आहे. अन्न धान्य, तेलबिया,भाज्या आणि फळे यांचा ई नाम वर व्यापार होतो. 1005 हून अधिक एफपीओची ई नाम वर नोंदणी असून 7.92 कोटी रूपयांच्या 2900 मेट्रिक टन कृषी मालाचा व्यापार झाला आहे.
कोविड-19 मुळे लागू करण्यात आलेल्या लॉक डाऊनच्या काळात मंडई मधली गर्दी कमी व्हावी यासाठी केंद्रीय कृषी मंत्र्यांनी 2 एप्रिल 2020 ला एफपीओ व्यापार मोड्यूल, लॉंजीस्टिक मोड्यूल जारी केले. तेव्हापासून 15 राज्यातल्या 82 एफपीओनी 2.22 कोटी रुपये किमतीचा 12048 क्विंटल वस्तूंचा व्यापार केला. 9 लॉंजिस्टिक सेवा एग्रीगेटरर्सनी ई नामशी भागीदारी केली असून 2,31,300 वाहतूकदार,ई नाम संबंधितांच्या वाहतूक सेवेसाठी 11,37,700 ट्रक पुरवत आहेत.
ई नाम ही केंद्र सरकारची महत्वाकांक्षी आणि यशस्वी योजना आहे. सध्याच्या कृषी उत्पन्न बाजार समित्याच्या मंडी परस्परांशी जोडून कृषी मालासाठी एकीकृत राष्टीय बाजारपेठ निर्माण करून कृषी विपणनात एकसमानतेला प्रोत्साहन देणे, मागणी आणि पुरवठा यावर आधरित वाजवी भावाला प्रोत्साहन देणे हा या योजनेचा उद्देश आहे.
1 मे 2020 रोजी तोमर यांनी 7 राज्यातल्या 200 ई नाम मंडी ई नामशी जोडल्या . ई नामच्या पहिल्या टप्यातली कामगिरी ( 585 मंडी एकीकृत) पाहता आपला विस्तार करत 15 मे 2020 पूर्वी आणखी 415 मंडी जोडण्याचे नियोजन असून यामुळे ई नाम मंडीची संख्या 1000 होईल. 18 राज्ये आणि 3 केंद्र शासित प्रदेशातल्या या मंडी मुळे पंतप्रधानांची ‘एक राष्ट्र एक बाजारपेठ’ ही संकल्पना साकारण्यासाठी मदत होणार आहे.
ई नाम हे देशातले इलेक्ट्रानिक व्यापार पोर्टल असून देशातल्या कृषी मालासाठी सध्याच्या मंडीचे एकीकरण करून एक राष्ट्र एक बाजारपेठ साकारण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 14 एप्रिल 2016 ला याचे उद्घाटन केले होते.
नाम पोर्टल सर्व कृषी उत्पन्न बाजार समित्यांशी संबंधित माहिती आणि सेवा एक खिडकी सेवे द्वारे पुरवते. मालाचा दर्जा आणि किंमत,शेतकऱ्यांच्या खात्यात थेट इलेक्ट्रोनिक पेमेंटद्वारे भरणा आणि शेतकऱ्यांना उत्तम बाजारपेठ प्राप्त होण्यासाठी मदत यांचा यात समावेश आहे.
M.Jaitly/N.Chitale/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com