गृह मंत्रालय

अडकून पडलेल्या स्थलांतरित मजुरांची जलदगतीने त्यांच्या घरी पाठवणी करता यावी, यासाठी आणखी जास्त संख्येने रेल्वेगाड्या विनाअडथळा चालवण्यामध्ये सहकार्य कराः केंद्रीय गृहमंत्रालयाचे राज्यांना आवाहन

प्रविष्टि तिथि: 11 MAY 2020 6:07PM by PIB Mumbai

 

नवी दिल्ली, 11 मे 2020

 

स्थलांतरित मजुरांची बस आणि श्रमिक स्पेशल ट्रेनने वाहतूक करण्यासाठी राज्ये/ केंद्रशासित प्रदेशांनी दिलेल्या सहकार्याचा आढावा घेण्यासाठी मंत्रिमंडळ सचिवांनी काल 10 मे 2020 रोजी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून एका बैठकीचे आयोजन केले.

या बैठकीच्या अनुषंगाने केंद्रीय गृहमंत्रालयाने सर्व राज्ये/ केंद्रशासित प्रदेशांना पत्र लिहून असे कळवले आहे की, आपल्या घरी जाण्यासाठी रस्त्यांनी किंवा रेल्वे मार्गांवरून पायी चालणाऱ्या स्थलांतरित मजुरांना प्रतिबंध करावा. या मजुरांना घरी पाठवण्यासाठी यापूर्वीच श्रमिक स्पेशल ट्रेन्स आणि बसेस चालवण्याची परवानगी देण्यात आली आहे, यावर यामध्ये भर देण्यात आला आहे. त्यामुळे त्यांना श्रमिक स्पेशल ट्रेन किंवा बसमध्ये प्रवास करण्याची परवानगी देण्यात यावी आणि तोपर्यंत या मजुरांची समजूत काढण्यासाठी समुपदेशन करावे आणि त्यांची जवळच्या निवाऱ्यांमध्ये सोय करावी.

अडकून पडलेल्या स्थलांतरित मजुरांना त्यांच्या घरी जलदगतीने पाठवता यावे, यासाठी जास्तीत जास्त प्रमाणात कोणत्याही अडथळ्याविना श्रमिक स्पेशल ट्रेन्स चालवता याव्यात याकरिता राज्ये व केंद्रशासित प्रदेशांनी सहकार्य केले पाहिजे यावर देखील भर देण्यात आला आहे.

*****

B.Gokhale/ S.Patil/P.Kor

***

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(रिलीज़ आईडी: 1623024) आगंतुक पटल : 252
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: Telugu , English , Urdu , हिन्दी , Manipuri , Bengali , Punjabi , Gujarati , Odia , Tamil , Kannada , Malayalam