विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालय
कोविड-19 विरुद्धच्या लढाईसाठी भारतीय तंत्रज्ञानाच्या संकलनाचे सीएसआयआर महासंचालकांच्या हस्ते लोकार्पण
हे संकलन समकालीन असून सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योजक, स्टार्टअप्स आणि मोठ्या प्रमाणात सामान्य लोकांना याचा फायदा होईल
Posted On:
06 MAY 2020 8:07PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 6 मे 2020
राष्ट्रीय संशोधन विकास महामंडळाने तयार केलेल्या “कोविड-19 विरुद्धच्या लढाईसाठी भारतीय तंत्रज्ञानाचे संकलन (शोध, चाचणी व उपचार करणे)” या पुस्तिकेचे आज नवी दिल्ली येथील सीएसआयआर मुख्यालयात डॉ. शेखर सी मांडे सीएसआयआर महासंचालक आणि डीएसआयआर सचिव यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले. या संकलनात कोविड-19 संबंधित सुमारे 200 भारतीय तंत्रज्ञान,चालू संशोधन कार्य, वाणिज्यिकरणासाठी उपलब्ध तंत्रज्ञान, केंद्र सरकार तर्फे राबविण्यात येणारे उपक्रम आणि प्रयत्न यांचा समावेश असून याचे वर्गीकरण ट्रॅकिंग (शोध), टेस्टिंग (चाचणी) आणि ट्रीटिंग (उपचार) याच्या 3Ts अंतर्गत केले आहे. यापैकी बहुतांश तंत्रज्ञानाने चाचणीची कसोटी पास केली असून उद्योजकांना उत्पादन वेगाने बाजारात आणण्यास मदत करू शकतात कारण त्यांना नव्याने पुन्हा स्थापित करण्याची आवश्यकता नाही. डॉ. मांडे यांनी कोविड-19 शी लढण्यासाठी भारतीय तंत्रज्ञानाचे संकलन करण्याच्या एनआरडीसीच्या उपक्रमाचे कौतुक केले आणि सांगितले की हे संकलन समकालीन असून सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योजक, स्टार्टअप्स आणि मोठ्या प्रमाणात सामान्य लोकांना याची मदत होईल”.
एनएसआरडीचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डॉ. एच पुरुषोत्तम यांनी सांगितले की, एनआरडीसी टीम ने सर्व हिताधारकांच्या फायद्यासाठी कोविड-19 विरुद्ध लढण्यासाठी सर्वाधिक प्रासंगिक आणि देशांतर्गत उदयोन्मुख विकसित तांत्रिक नवोन्मेशांचे संकलन केले आहे. हे संकलन धोरण निर्माते, उद्योग, उद्योजक, स्टार्टअप्स, सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योजक, संशोधन तज्ञ, वैज्ञानिक आणि इतरांसाठी तयार-संदर्भ म्हणून काम करेल. संकलित केलेल्या अनेक तंत्रज्ञानाला आयसीएमआर द्वारे मान्यता देखील मिळाली असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली.
या संकलनात सादर केलेली माहिती, विज्ञान आणि तंत्रज्ञान विभाग (डीएसटी), जैव तंत्रज्ञान विभाग (डीबीटी), भारतीय वैद्यकीय संशोधन परिषद (आयसीएमआर), इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय, वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषद (सीएसआयआर), संरक्षण संशोधन आणि विकास संस्था (डीआरडीओ), भारतीय तंत्रज्ञान संस्था (आयआयटी), विज्ञान आणि अभियांत्रिकी संशोधन मंडळ (एसईआरबी), तंत्रज्ञान विकास मंडळ (टीडीबी), राष्ट्रीय नाविन्य फाउंडेशन (एनआयएफ), स्टार्टअप इंडिया आणि अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषद (एआयसीटीई), श्री चित्र तिरुनल वैद्यकीय विज्ञान आणि तंत्रज्ञान संस्था (एससीटीआयएमएसटी) आणि भारतीय विज्ञान संस्था (आयआयएससी) यासह विविध सरकारी संस्था आणि प्रमुख शैक्षणिक संस्थांकडून प्राप्त झाली आहे. तंत्रज्ञानाच्या हस्तांतरणासह अधिक माहितीसाठी cmdnrdc@nrdc.in संपर्क साधू शकतात.
फोटो मथळा : सीएसआयआर मुख्यालय, नवी दिल्ली येथे डॉ. शेखर सी. मांडे, महासंचालक सीएसईआर आणि सचिव, डीएसएसईआर, “कोविड-19 विरुद्धच्या लढाईसाठी भारतीय तंत्रज्ञानाचे संकलन (शोध, चाचणी व उपचार करणे)” या पुस्तिकेचे लोकार्पण करताना. त्यांच्यासमवेत एनआरडीसीचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक डॉ. एच. पुरुषोत्तम उपस्थित आहेत
M.Jaitly/S.Mhatre/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1621580)
Visitor Counter : 210