विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालय

जलद आणि प्रभावी निकालासाठी वर्धित सहकार्य विकसित करण्याचे डॉ. हर्ष वर्धन यांचे सर्व वैज्ञानिक विभागांना आवाहन.


नियमन प्रक्रियेला गती देण्यासाठी सर्व नियामक कार्यरत आणि प्रयोगशाळेतील चाचण्यांना विज्ञान आणि औद्योगिक संशोधन परिषदेचे (सीएसआयआर) समर्थन-डॉ. हर्षवर्धन

सीएसआयआर-सीआरआयआयने (केंद्रीय रस्ते संशोधन संस्था) विकसित केलेल्या 'सार्वजनिक वाहतूक आणि फीडर मोडसाठी शारीरिक अंतर नियमानुसार मार्गदर्शक तत्त्वे' जारी.

असे म्हणतात कि कोविड -19 नंतर, समाजात एक नवीन जीवनशैली विकसित होईल आणि चांगल्या पद्धतीने जगण्यासाठी वैज्ञानिक पद्धतीने नवीन मानक स्थापित केले जातील, जे अखेरीस चांगले आरोग्यविषयक नियम म्हणून मानले जातील.

Posted On: 04 MAY 2020 8:22PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 4 मे 2020


देशात कोविड-19 चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी  सीएसआयआर अर्थात विज्ञान आणि औद्योगिक संशोधन परिषद करीत असलेल्या विविध उपक्रमांचा आढावा विज्ञान - तंत्रज्ञान, पृथ्वी विज्ञान आणि आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री डॉ. हर्ष वर्धन यांनी आज व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे घेतला.

सीएसआयआरने सर्व 38 सीएसआयआर प्रयोशाळांचा समावेश असलेली एक समन्वित रणनीती तयार केली आहे आणि सद्यस्थितीत हस्तक्षेप तसेच तंत्रज्ञानासाठी उद्योग आणि इतर संस्थांसमवेत सतत संपर्क करीत आहे अशी माहिती सीएसआयआरचे महासंचालक डॉ. शेखर सी मांडे यांनी मंत्र्यांना दिली.

सीएसआयआरने कोविड-19 चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी विज्ञान आणि तंत्रज्ञानावर आधारित पाच विभाग  तयार केले आहेत: डिजिटल आणि आण्विक पाळत ठेवणे; वेगवान आणि आर्थिक रोगनिदान; नवीन औषधे/ लसींचा वापर/लसी; रुग्णालय सहाय्यक उपकरणे आणि पीपीई; पुरवठा साखळी आणि वाहतूक समर्थन प्रणाली हे ते पाच विभाग. विभाग समन्वयक संचालकांनी सादर केलेल्या पाच विभागांमधील महत्त्वपूर्ण घडामोडी.

सीएसआयआर प्रयोगशाळा विज्ञान तंत्रज्ञानावर आधारित उपाययोजनांव्यतिरिक्त या कठीण प्रसंगात महत्वपूर्ण भूमिका बजावीत असून लोकांना सॅनिटायझर्स, मास्क, तयार खाद्यपदार्थ पुरवीत आहेत अशी माहिती या संवादादरम्यान डॉ. हर्षवर्धन यांना देण्यात आली.

जलद आणि प्रभावी निकालासाठी वर्धित सहकार्य  विकसित करण्याचे आवाहन त्यांनी वैज्ञानिक विभागांना केले. सर्व शास्त्रज्ञांनी आणि संस्थांनी त्या त्या वेळेनुसार आवश्यकतांना प्राथमिकता दिली पाहिजे आणि त्वरित उपाय शोधण्यात देखील योगदान द्यावे असे ते म्हणाले. “सीएसआयआरच्या शास्त्रज्ञांचा उत्साह पाहून आनंद झाला असून आणि गेल्यावेळच्या आढाव्यापासूनच सीएसआयआरने चांगली प्रगती केली आहे,” असे त्यांनी सांगितले. विविध औषधे, लस आणि इतर निदान व उपचारात्मक उपकरणाच्या परवडणार्‍या घटकांचादेखील विचार केला पाहिजे असेही डॉ. हर्षवर्धन यांनी सांगितले.

डॉ हर्ष वर्धन यांनी जागतिक कोरोना विषाणू माहिती संग्रहात कोविड-19 जीनोमचे (जनुक संचय) 53 अनुक्रम  ग्लोबल इनिशिएटिव्ह ऑन शेअरींग ऑल इन्फ्लूएंझा डेटा (जीआयएसएआयडी) वर सादर केल्याबद्दल सीएसआयआरचे कौतुक केले. “नॅशनल सेंटर फॉर डिसीज कंट्रोल (एनसीडीसी), नवी दिल्ली आणि सीएसआयआर इन्स्टिट्यूट ऑफ जेनोमिक्स अँड इंटिग्रेटिव्ह बायोलॉजी” (सीएसआयआर-आयजीआयबी) यांच्यात झालेल्या भागीदारीचा हा परिणाम आहे. संयुक्त एनसीडीसी-सीएसआयआर कार्यक्रम भारतातील आण्विक महामारी वरिल निरिक्षणाच्या प्रयत्नांना गती देईल, ”असे ते म्हणाले.

नियामक प्रक्रियेला गती देण्यासाठी भारतीय नियामक काम करीत आहे असे डॉ. हर्ष वर्धन यांनी नमूद केले. सीएसआयआरने समर्थन दिलेल्या मायकोबॅक्टेरिअम आधारित सेपसिव्हॅकच्या कोविड -19 ग्रस्त रूग्णांवर प्रयोगशाळेत तीन चाचण्या करायला आणि त्यांना दिलासा द्यायला उद्योगांना मान्यता मिळाली आहे असे त्यांनी सांगितले.

सीएसआयआरच्या प्रयत्नांमधील आणखी एक मुख्य प्रयत्न म्हणजे रॅमडेसिव्हिरसाठी, कोविड 19  रूग्णांच्या आपत्कालीन वापरासाठी यूएस-एफडीएने नुकतेच मंजूर केलेले एक औषध, किलो स्केलवरील की स्टार्टिंग मटेरियल (केएसएम) चे संश्लेषण आणि रेमडेसिव्हिरचे ग्रॅम स्केल संश्लेषण प्राप्त केले आहे. भारतीय उद्योगांसाठी सीएसआयआर-आयआयसीटी (इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजी) आणि तंत्रज्ञानाचे प्रदर्शन सुरू आहे. कोविड-19 चे आणखी एक आशादायक औषध फवीपिरावीरसाठी प्रयोगशाळेतील चाचण्या करून ते भारतात सुरु करण्यासाठी सीएसआयआर खासगी क्षेत्राबरोबर कार्यरत आहे.

रुग्णालयाची विविध उपकरणे व पीपीईमध्ये होणाऱ्या तुटवड्यांबाबत तातडीने तोडगा काढण्यासाठी सीएसआयआरच्या प्रयत्नांचेही मंत्र्यांनी कौतुक केले. विशेष उल्लेखनीय बाब म्हणजे सीएसआयआर-एनएएलने अगदी थोड्याच अवधीत बाईपॅप व्हेन्टिलेटरसह 35 दिवसांच्या आत प्रवेश केला आहे आणि ते प्रमाणपत्राच्या प्रतीक्षेत आहेत. सीएसआयआर-नॅशनल एरोस्पेस लॅबोरेटरीज (एनएएल) आणि एमएएफएल यांनी संयुक्तपणे एक करार तयार केला आहे आणि एचएलएलकडून 50,000 व्हेंटीलेटरची  ऑर्डर प्राप्त केली असून दिवसाला 30,000 ची निर्मिती करण्यास तयार आहे.

सीएसआयआर-सीआरआयआरने (केंद्रीय रस्ते संशोधन संस्था) विकसित केलेल्या शारीरिक अंतराच्या निकषांवर विचार करून सार्वजनिक वाहतूक आणि फीडर मोडच्या मार्गदर्शक सूचनाही मंत्र्यांनी जाहीर केल्या. डॉ. हर्ष वर्धन यांनी सीएसआयआरच्या प्रयत्नांचे कौतुक केले आणि ते म्हणाले,"कोविड -19 नंतर, समाजात एक नवीन जीवनशैली विकसित होईल आणि चांगल्या पद्धतीने जगण्यासाठी वैज्ञानिक पद्धतीने नवीन मानक स्थापित केले जातील, जे अखेरीस चांगले आरोग्यविषयक नियम म्हणून मानले जातील.“


* * *


B.Gokhale/V.Joshi/D.Rane


(Release ID: 1621026) Visitor Counter : 238