विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालय

कोविड-19 च्या तयारीबाबत विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागाबरोबर डॉ हर्षवर्धन यांनी केली बातचीत


डीएसटी आणि संबंधित स्वायत्त संस्थांनी देशातील विज्ञान आणि तंत्रज्ञानाचा दर्जा आंतरराष्ट्रीय स्तरापर्यंत उंचावला - डॉ. हर्षवर्धन

कोविड-19 वर आधारित मल्टीमीडिया मार्गदर्शक 'कोविड कथा' प्रकाशित.

Posted On: 03 MAY 2020 10:36PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 3 मे 2020


केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान, आरोग्य आणि कुंटुंब कल्याण तसेच पृथ्वी विज्ञान मंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी आज डीएसटीच्या 50 व्या स्‍थापना दिवसाच्या निमित्ताने व्हीडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून सर्व स्वायत्त संस्था (एआय) आणि विज्ञान आणि तंत्रज्ञान विभाग (डीएसटी)च्या अखत्यारीतील कार्यालय प्रमुखांबरोबर चर्चा केली. प्रामुख्याने कोविड-19 चे उच्चाटन करण्यासाठीच्या उपाययोजनांवर बैठकीत चर्चा झाली.  

कोविड-19 वर आधारित मल्टीमीडिया मार्गदर्शक 'कोविड कथा' याचे लोकार्पणही हर्षवर्धन यांनी यावेळी केले. विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या माध्यमातून राष्ट्रसेवा करत डीएसटीने 50 व्या वर्षात प्रवेश केला आहे. त्याच्या सुवर्ण महोत्सवा निमित्त देशभरात विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. 

डीएसटीचे सचिव प्राध्यापक आशुतोष शर्मा यांनी डीएसटीचा मुख्य उद्देश, कामगिरी आणि येत्या पाच वर्षांत साध्य करायच्या उद्दीष्ट आणि दृष्टीकोनावर प्रकाश टाकला. 

डीएसटीद्वारे, कोविड-19 वर मात करण्यासाठी  निदान, चाचणी, आरोग्याची काळजी घेणे याबरोबरच उपकरणे आणि पुरवठा सुरळीत व्हावा यासाठी उपाययोजना केल्या जात आहेत. त्यादृष्टीने संशोधन आणि विकास प्रयोगशाळा, शैक्षणिक संस्था, स्टार्ट-अप आणि एमएसएमईच्या माध्यमातून तंत्रज्ञानाची मदत घेतली जात असल्याचे त्यांनी सांगितले. 

राष्ट्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान उद्योजक विकास मंडळ अर्थात नॅशनल सायंस अँड टेक्नॉलॉजी आंत्रप्रेन्योरशिप डेव्हलपमेंट बोर्ड (एनएसटीईडीबी), सायंस फॉर इक्विटी, एम्पावरमेंट अँड डेव्हलपमेंट (एसईईडी) आणि सायंस अँड इंजीनियरिंग रिसर्च बोर्ड (एसईआरबी), टेक्नॉलॉजी डेव्हलपमेंट बोर्ड (टीडीबी) आणि सर्वे ऑफ इंडिया (एसओएल) या सारख्या प्रतिष्ठित संस्थाचे वरिष्ठ वैज्ञानिक आणि अधिकाऱ्यांनी या संकटाच्या उच्चाटनासाठी उचलल्या जात असलेल्या पावलांची माहिती दिली. 

श्री चित्रा तिरुनल इंस्टीट्यूट फॉर मेडिकल सायंसेस अँड टेक्नॉलॉजी (एससीटीआईएमएसटी) तिरुवनंतपुरम, इंटरनॅशनल अॅडव्हांस्ड रिसर्च सेंटर फॉर पावडर मेटलर्जी अँड न्यू मटेरियल (एआरसीआई) हैदराबाद, जवाहरलाल नेहरू सेंटर फॉर अॅडव्हांस सायंटिफिक रिसर्च (जेएनसीएएसआर), सेंटर फॉर नॅनो अँड सॉफ्ट मॅटर सायंसेस (सीईएनएस) बेंगळुरु, नॅशनल इनोवेशन फाउंडेशन (एनआईएफ) अहमदाबाद आणि एसएन बोस नॅशनल सेंटर फॉर बेसिक सायंसेस (एसएनबीएनसीबीएस) कोलकाता या सारख्या स्वायत्त संस्थांच्या संचालकांनी या संकटाच्या निवारणासाठी केलेल्या तयारीबाबत सांगितले. 

डॉ. हर्षवर्धन यांनी डीएसटीला 50 व्या स्थापना दिवसा निमित्ताने यावेळी शुभेच्छा दिल्या. 'डीएसटी आणि संबंधित स्वायत्त संस्थांनी भारतात विज्ञान आणि तंत्रज्ञानाचा दर्जा आंतरराष्ट्रीय स्तरापर्यंत उंचावल्याचे गौरवोद्गार त्यांनी यावेळी काढले. समाजातल्या विविध घटकांना याचा लाभ मिळत असल्याचेही त्यांनी नमूद केले. डीएसटी, विविध संस्थांच्या आणि विषयांच्या माध्यमातून निवड झालेल्या वैज्ञानिकांच्या सहाय्याने राष्‍ट्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञानासंबंधीत क्षमता वृद्धिंगत करते. त्यासाठी सतत दक्ष राहून देशात संशोधन आणि विकासाचे सहकार्य प्रदान करते. डीएसटीच्या प्रयत्नांमुळे भारताला विज्ञानासंबधित आंतरराष्ट्रीय नियतकालिकांमध्ये, पत्रिकांमधे प्रकाशनाच्या संख्येचा विचार करता चीन आणि अमेरिकेनंतर जागतिक पातळीवर तीसरे  स्थान प्राप्त झाले आहे.

डॉ. हर्षवर्धन यांनी कोविड-19 वर मात करण्यासाठी भारतीय वैज्ञानिकांनी योग्यवेळी दिलेल्या योगदानासाठी त्यांची प्रशंसा केली. 'भारतीय वैज्ञानिकांनी नेहमीच आव्हाने स्विकारली आहेत. या वेळीही त्यांनी देशाला निराश केले नाही. असे ते म्हणाले. विविध आघाड्यांवर वेगाने आणि व्यापक कृतीची आवश्यकता होती हे आपण लक्षात घ्यायला हवे, उदाहरणार्थ

  1. संपूर्ण स्टार्टअप अर्थव्यवस्थेची व्यापक रुपरेषा तयार करणे, जेणेकरून उपयुक्त तंत्रज्ञानाची मदत घेतली जाईल. 
  2. मॉडलिंग, विषाणूची लक्षणे तसेच प्रभाव, अभिनव उपाय यावर काम करणाऱ्या तज्ञ तसेच संशोधन आणि विकास प्रयोगशाळांच्या माध्यमातून उद्योग आणि प्रकल्पांना मदत.
  3. उपाययोजना प्रदान करण्यासाठी डीएसटीच्या स्वायत्त संस्थांना सक्रिय करणे. 

या सर्व परिस्थितीत डिएसटीच्या वैज्ञानिकांनी सर्वोत्तम काम केले याचा आनंद वाटतो असे त्यांनी सांगितले. याप्रसंगी एससीटीआईएमएसटी तिरुवनंतपुरमचा विशेष उल्लेख करावा वाटतो. त्यांनी यासंदर्भात आधीच दहापेक्षा अधिक प्रभावी उत्पादने तयार केली आहेत. त्यांचे उत्पादन वेगाने सुरु आहे असेही मंत्रिमहोद्यानीं नमूद केले.

'विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या या विभागाने 49 वर्षांत आपल्या देशाच्या विज्ञान आणि तंत्रज्ञानाला नमोन्मेषी क्षेत्रात व्‍यापक योगदान दिले आहे. इनक्यूबेटर्स आणि स्टार्ट-अपच्या संख्येत उल्‍लेखनीय वाढ झाली आहे. सोबतच यात वेगाने प्रगती होत असल्याचे डॉ हर्षवर्धन म्हणाले. "युवा वैज्ञानिकांना शोधकार्यावर विज्ञान लेख लिहिण्यासाठी प्रोत्साहित करण्याच्या उद्देशाने अनेक योजना आणि कार्यक्रम तयार केले आहेत. उदाहरणार्थ: ऑग्‍मेंटिंग रायटिंग स्किल्‍स थ्रू आर्टिकुलेटिंग रिसर्च (एडब्‍ल्‍यूएसएआर), स्टार्टअपला प्रोत्साहन देण्यासाठी नॅशनल इनिशिएटिव फॉर डेव्हलपिंग अँड हारनेसिंग इनोवेशन (एनआईडीएचआई) कार्यक्रम, युवा विद्यार्थ्यांना अभिनव पद्धतीने विचार करण्यासाठी प्रोत्साहन देण्याकरीता मिलियन माइंड्स ऑगमेंटिंग नॅशनल एस्पिरेशंस अँड नॉलेज (एमएएनएके), नॅशनल मिशन ऑन इंटरडिसिप्लिनरी सायबर-फिजिकल सिस्टम्स, सर्वश्रेष्ठ वैश्विक विज्ञान प्रकल्पांसोबत काम करता यावे यासाठी  विज्ञान आणि तंत्रज्ञानात   अंतरराष्ट्रीय सहकार्यच्या दृष्टीने पावले उचलली जात आहेत.  40 दशलक्षअमेरिकी डॉलर्सच्या गुंतवणूकीतून भारत- इस्राइल औद्योगिक संशोधन आणि विकास आणि तंत्रज्ञान नवोन्मेषी निधिला देशाच्या  विज्ञान आणि तंत्रज्ञान प्रयत्नांनी खूप पुढे नेल्याचे ते म्हणाले.

केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्र्यांनी यावर्षीच्या अर्थसंकल्पात वित्तमंत्र्यांद्वारे 8 हजार कोटी रुपयांची तरतूद केली आहे. त्यातून क्वांटम तंत्रज्ञान आणि प्रयोग (एनएम-क्‍यूटीए) यावर आधारित राष्ट्रीय अभियान सुरु करण्याची घोषणा झाली आहे. याचा विशेष उल्लेख करत ते म्हणाले की 'एनएम-क्यूटीए सुरु करणे क्वांटम टेक्नॉलॉजी आणि संबंधित क्षेत्रांना प्रोत्साहन देण्यासाठी मोठी भरारी आहे. यात  क्वांटम कंप्यूटिंग, क्वांटम क्रिप्टोग्राफी, क्वांटम दूरसंचार, क्वांटम मेट्रोलॉजी और सेंसिंग, क्वांटम इनहेंस्‍ड इमेजिंग आदिंचा समावेश आहे. डीएसटी सर्वसामान्य जनतेला लाभ मिळवून देण्यासाठी  अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने नक्कीच यश प्राप्त करेल असा विश्वास डॉ हर्षवर्धन यांनी यावेळी व्यक्त केला.  

'डीएसटी द्वारे वैज्ञानिक सामाजिक उत्तरदायित्व आधारित राष्ट्रीय धोरण तयार करत आहे. या द्वारे  नवोन्मेष आणि सामाजिक उद्यमशीलता यांच्या सिद्धांवर आधारित हे धोरण असेल. समाज, विज्ञान, शाळा, महाविद्यालय, विद्यापीठे, तंत्रज्ञान संस्था, उपकरणे, श्रमशक्ती यासाह प्रत्येक घटकाला अधिक सक्षम, विकसित करणारे, त्यांच्या हिताचे, लाभदायक असे हे धोरण ठरेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.


* * *

M.Jaitly/V.Ghode/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1620892) Visitor Counter : 158