कोळसा मंत्रालय

कोळसा खाणींचे कार्यान्वयन लवकर सुकर करण्यासाठी कोळसा मंत्रालयाकडून प्रकल्प देखरेख एकक सुरू

Posted On: 30 APR 2020 7:41PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 30  एप्रिल 2020

 

केंद्र सरकारने वाटप केलेल्या कोळसा खाणींचे कार्यान्वयन लवकर सुकर करण्यासाठी कोळसा मंत्रालयाने प्रकल्प देखरेख एकक सुरू केले आहे. व्यवसाय सुलभतेसाठी हे महत्त्वाचे पाऊल आहे.

यावेळी कोळसा मंत्रालयाचे सचिव अनिल कुमार जैन यांनी  उत्खननासाठी परवाना मिळालेल्यांना व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून  संबोधित केले. कोळसा उत्पादन लवकरात लवकर सुरू होण्याच्या दृष्टीने आपल्या अडचणी सोडवण्यासाठी सल्लागारांच्या सेवेचा निःसंकोच लाभ घ्यावा असे जैन यांनी यावेळी सांगितले.

कोळसा खाणींच्या कार्यान्वयासाठी केंद्र/राज्य सरकारी  आवश्यक परवानग्या मिळवण्यात कोळसा खाणींचे वाटप झालेल्यांना  साहाय्य व्हावे यासाठी प्रकल्प देखरेख एकक सुरू करण्यात आले आहे.

व्यावसायिक क्षेत्राच्या लिलाव फेरीत बोली लावणाऱ्यांसाठीही हे पाऊल आकर्षक ठरेल अशी अपेक्षा आहे. कोळसा उद्योगात उद्योगाभिमुख वातावरणाला यामुळे चालना मिळेल तसेच उत्पादनात सुधारणा होईल.

पारदर्शक निविदा प्रक्रियेच्या माध्यमातून प्रकल्प देखरेख एककात मे. केपीएमजी यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

 

B.Gokhale/S.Kakade/P.Malandkar

 

 

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1619705) Visitor Counter : 185