रेल्वे मंत्रालय

भारतीय रेल्वेने कोविड-19 च्या काळात नवनवीन कल्पनांचा पाठपुरावा करून मालवाहतूकीद्वारा वस्तुंचा तडाखेबंद पुरवठा केला


​​​​​​​उत्तरेकडील अन्नपूर्णा गाडी आणि दक्षिणेकडील जय किसान खास गाड्यांद्वारे लांब पल्ल्याच्या अतिजलद गाड्यांची केली सुरुवात

5000 टन आणि 80 लांब रेक्सच्या मदतीने देशभरात धान्य पुरवठा

1 एप्रिल ते 16 एप्रिलच्या दरम्यान 3 कोटी 20 लाख टन पेक्षा जास्त धान्य पुरवठा झाला, गतवर्षी याच काळात 1 कोटी 29 लाख टन धान्य पुरवठा झाला होता

Posted On: 17 APR 2020 9:55PM by PIB Mumbai

 

नवी दिल्ली, 17 एप्रिल 2020

 

कोविड-19 च्या पार्श्वभूमीवर देशभरात सुरू असलेल्या लाँकडाऊनच्या काळात भारतीय रेल्वेने कठोर परीश्रम करून मालवाहतूकीद्वारे आवश्यक वस्तूंचा पुरवठा करून सरकारच्या प्रयत्नांना मदत करणे सुरु ठेवले आहे.

केंद्र सरकारने जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा करण्याकडे लक्ष केंद्रीत केले असून क्रुषीमाल राज्याराज्यात विनाअडथळा पुरवला जात आहे. गतवर्षीच्या  एप्रिल महिन्यापेक्षा यावेळी अन्नधान्याचा जास्त पुरवठा होत आहे. 3 कोटी 20 लाख टन पेक्षा जास्त धान्य पुरवठा यंदाच्या 1 एप्रिल ते 16 एप्रिलमध्ये झाला. गेल्यावर्षी हे प्रमाण 1 कोटी 29 मेट्रिक टन एवढे होते.

जास्त धान्य जलदगतीने पाठवण्यासाठी भारतीय रेल्वेने दोन नव्या मालवाहतूक गाड्या सुरू केल्या आहेत. उत्तर रेल्वे आणि दक्षिण मध्य रेल्वे नवनवीन यशाच्या पायऱ्या गाठीत आहेत.

उत्तर रेल्वेने 5000 टन माल वाहून नेणाऱ्या  लांब पल्ल्याच्या जास्त मालवाहून गाड्या सुरू केल्या आहेत. अशा प्रकारच्या 25 अन्नपूर्णा गाड्या तयार करून त्या 16 एप्रिल 2020 पर्यंत धावत ठेवल्या  होत्या. या गाड्या आसाम, बिहार, गोवा ,गुजरात, कर्नाटक, महाराष्ट्र, मणिपूर, नागालँड, ओदिशा, तामिळनाडू, उत्तरप्रदेश, पश्चिम बंगाल,मिझोराम या सर्व राज्यात पोचल्या. या लांब पल्ल्याच्या जास्त मालवाहतूक करणाऱ्या गाड्या एफआयआरमधील न्यूबाँगाँयगाँव  (NBQ) येथपर्यंत पोचल्या.

उत्तर रेल्वेप्रमाणे आता दक्षिण मध्य रेल्वेने देखील जय किसान नावाची नवीन गाडी देशातील वेगवेगळ्या भागात धान्य पुरवठा करण्यासाठी सुरु केली आहे.

प्रवासी वाहतूक करणाऱ्या गाड्या बंद असल्याने दोन वेगवेगळ्या ठिकाणांहून मालवाहतूक करणाऱ्या गाड्या एका जवळच्या ठिकाणी एकत्र आणून त्याची सलग एक गाडी करून माल पोचवणे सध्या शक्य झाले आहे.

सर्व साधारणपणे एका गाडीला 42 डबे (वाघिणी)असून 2600 टन धान्य वाहून नेणे शक्य असते पण दोन गाड्या एकत्र केल्याने 42 + 42 = 82 डब्यातून( वाघिणींमधून) 5200 टन धान्य वाहून नेणे शक्य झाले आहे. यामुळे प्रवासाच्या वेळेची बचत होत आहे.

दक्षिण मध्य रेल्वेने याची सुरुवात दोन खास जय किसान गाड्या जोडून केली.

अशी पहिली गाडी  दक्षिण मध्य रेल्वेच्या तेलंगणा मधील द्रोणाकल जंक्शनला दक्षिण रेल्वेच्या सेवूरू आणि चेट्टीनाड इथून सुटणाऱ्या  गाड्यांना द्रोणाकल जंक्शन येथे जोडून पाठवली गेली.त्याचप्रमाणे दुसरी अशीच गाडी दक्षिण रेल्वेच्या (दिंडीगल आणि मुदियापक्कम इथून सुटणाऱ्या) गाडीला दक्षिण मध्य रेल्वेच्याद्रोणाकल जंक्शन इथे जोडून पाठवण्यात आली. तसेच गाड्या अत्यावश्यक सेवापुरवठा करण्यासाठी ताशी 44 किलोमीटर इतक्या वेगाने धावल्या.

लाँकडाऊनमुळे साखळी पुरवठ्याचे काम करण्यात सातत्य राखणे जिकिरीचे होते. शेवटच्या टप्प्यात माल उतरवणे, जिल्हा पातळीवर मजूर उपलब्ध करणे यासाठी  राज्य पातळीवरील अधिकारी वर्गाची भारतीय रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना मदत होत आहे. राष्ट्रीय अन्न महामंडळाच्या मदतीने काटेकोरपणे राज्याराज्यातील अंतिम स्थाने निश्चित करण्यात आली आहेत. कर्मचाऱ्यांना घरापासून आँफिसपर्यंत पोचण्यासाठी तातडीच्या वाहनांची आणि खास कर्मचारी गाड्यांची व्यवस्था करण्यात येत आहे.

 

G.Chippalkatti/S.Patgoankar/P.Kor



(Release ID: 1615528) Visitor Counter : 195