दूरसंचार आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय

पोस्टल आयुर्विमा आणि ग्रामीण पोस्टल आयुर्विम्याच्या हप्त्याची रक्कम भरायला 30 जून 2020 पर्यंत मुदतवाढ

Posted On: 09 APR 2020 8:35PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 9 एप्रिल 2020

कोरोना विषाणू( कोविड-19) प्रादुर्भावाची भीती आणि देशभरात सर्वत्र जारी असलेला लॉकडाऊन यांचा विचार करून केंद्र/राज्य सरकारांनी अनेक मार्गदर्शक सूचना केल्या आहेत आणि सर्वसामान्य लोकांच्या ये-जा करण्यावर निर्बंध घातले आहेत.

पोस्टल आयुर्विमा(पीएलआय)/ ग्रामीण पोस्टल आयुर्विम्याच्या(आरपीएलआय) ग्राहकांना, अनेक टपाल कार्यालये अत्यावश्यक सेवेचा एक भाग म्हणून सुरू असून देखील टपाल कार्यालयात जाऊन विम्याचे हप्ते भरण्यात अडचणी येत आहेत.

पीएलआय/ आरपीएलआयच्या ग्राहकांना सोयीचे व्हावे म्हणून पोस्टल लाईफ इन्शुरन्सचे संचालक, टपाल विभाग, दळणवळण मंत्रालयाने मार्च 2020, एप्रिल 2020 आणि मे 2020 या महिन्यांच्या विम्याचे हप्ते 30 जून 2020 पर्यंत कोणताही दंड/ डिफॉल्ट फी विना भरण्यास परवानगी दिली आहे. या विभागाने ग्राहकांना पीएलआय कस्टमर पोर्टलचा वापर करून पोर्टलवर ऑनलाईन हप्ता भरण्याचा सल्ला दिल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे.

 

U.Ujgare/S.Patil/P.Malandkar

 



(Release ID: 1612709) Visitor Counter : 162