संरक्षण मंत्रालय
माजी सैन्यकर्मचाऱ्यांनी कोविड 2019 मुकाबला करण्यासाठी उचलली पावले
Posted On:
07 APR 2020 12:04PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 7 एप्रिल 2020
संपूर्ण देश कोविड 2019 चा मुकाबला करत असतानाच भारतीय लष्कर, वायुसेना, तसेच नौदलाच्या माजी कर्मचाऱ्यांनी देखील यामध्ये मदतीचा हात देऊ केला असून, स्वतः पुढाकार घेऊन, ते नागरी आस्थापनांना त्यांच्या कार्यात मदत करत आहेत.
हे कार्य माजी सैन्य कर्मचारी कल्याण विभाग, संरक्षण मंत्रालय यांच्या समन्वयाने, सुरू आहे.
यासाठी त्यांनी केंद्रीय सैनिक मंडळाशी संपर्क साधला असून त्याच्या राज्यभरातील 32 तसेच 403 जिल्हापरिषद शाखांद्वारे हे कार्य सुरु आहे.
कर्नाटक
कर्नाटक राज्यात, नि.ब्रिगेडीअर रवी मुन्निस्वामी यांच्या समन्वयाने हे कार्य सुरू असून, बंगळुरू येथे 45 अनुभवी, उत्तम सायकलपटू सज्ज झाले आहेत. व्हाँट्स अँपच्या माध्यमातून
ते, परिसरातील वॄध्द आणि गरजू नागरिकांना, आवश्यक गोष्टींचा पुरवठा करत आहेत. त्याव्यतिरिक्त अनेक माजी सैन्यकर्मचारी स्वयंसेवक म्हणून धारवाड, दावणगिरी, शिवमोगा, हसन, म्हैसूर आणि कोडागू येथे अन्नपुरवठा तसेच लाँकडाऊन व्यवस्थापन योग्य रीतीने होण्यासाठी मदत करत आहेत.
आंध्रप्रदेश
आंध्रप्रदेश राज्यात 300 माजी सैन्यकर्मचारी स्वयंसेवक म्हणून राज्य पोलीस दलाला मदत करत आहेत. आंध्रप्रदेशातील तालडेपल्लिगुडेम, पश्चिम गोदावरी संघटना, तसेच मंगलगिरी येथील 28 वायुदलाच्या पलटणीची संघटना (मासैक), गरीबांना अन्न आणि जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा करत आहेत. श्री.चैतन्य (मासैक) संघटना भीमुनीपट्टनम, राज्य पोलिस दलाला लाँकडाऊन व्यवस्थित निभावण्यात मदत करत आहेत.
उत्तरप्रदेश
नि.ब्रि.रवी यांनी दिलेल्या माहितीनुसार उत्तरप्रदेश राज्यातील, 75 जिल्ह्यात जिल्हा सैनिक संघ, ठिकठिकाणी सामाजिक परिस्थितीवर लक्ष ठेवून असून, रेशनचा पुरवठा तसेच गरजूंसाठी सामुदायिक स्वैपाकघरातून जेवणाची व्यवस्था पहात आहे, तसेच माजी सैनिकांना देखील मदत करत आहेत. याव्यतिरिक्त त्यांनी 6592 माजी वैद्यकीय लष्करी कर्मचाऱ्यांना सज्ज राहण्यास सांगितले आहे.
पंजाब
ब्रि.सतिंदर सिंग, संचालक पंजाब राज्य सैनिक मंडळ यांनी दिलेल्या माहितीनुसार पंजाब राज्यात ठिकठिकाणी 4200 माजी सैन्य कर्मचारी, हे प्रत्येक गावात कार्यरत असून वस्तीचं पालकत्व स्विकारून, सर्वत्र माहिती गोळा करण्याचे तसेच सामाजिक परिस्थिती वर लक्ष ठेवण्याचे काम करत आहेत.
छत्तीसगड
छत्तीसगड राज्यात एअर कमांडर ए.एन.कुलकर्णी, (व्हिएसएम.) यांनी दिलेल्या माहितीनुसारआतापर्यंत मूठभर माजी सैन्यकर्मचारी कार्यरत असून ते विलासपूर, झांजगिर, कोरबा याठिकाणी राज्य पोलीस दलाला सहकार्य करत आहेत.
ईशान्य
नि.ब्रि.नारायण दत्त जोशी (SM) यांनी कळवलेल्या माहितीनुसार आसाम राज्यात, 19 जिल्ह्यात 300 माजी सैन्यकर्मचारी स्वयंसेवक म्हणून काम करत आहेत. तर नि.कर्नल गौतम कुमार राय यांनी दिलेल्या माहितीनुसार शिलाँगमधे 79 स्वयंसेवक, नागरी व्यवस्थापनामधे मदत करत आहेत. नि.ब्रि.जे.पी.तिवारी यांनी दिलेल्या अहवालानुसार त्रिपुरा राज्यात स्वयंसेवक म्हणून काम करणाऱ्या माजी सैन्य कर्मचाऱ्यांची नावे राज्य आणि जिल्हा प्रशासनाला कळवण्यात आली असून गरजेनुसार त्यांची मदत घेण्यात येणार आहे.
झारखंड, हरियाना, उत्तराखंड
नि.ब्रि.पाठक, झारखंड, नि.कर्नल. राहुल यादव, हरयाणा, तसेच नि.ब्रि.के.बी.चंद उत्तराखंड यांनी देखील आपापल्या राज्यात अशाच प्रकारे कार्य केले आहे.
संपूर्ण देशभरात लाँकडाऊन असताना भारतीय लष्कर, वायुसेना आणि नौदलाच्या माजी सैन्यकर्मचारी स्वयंसेवक म्हणून करत असलेले त्यांचे कार्य अत्यंत कौतुकास्पद आहे.
B.Gokhale/S.Padagaokar/D.Rane
(Release ID: 1611941)
Visitor Counter : 325
Read this release in:
English
,
Urdu
,
Hindi
,
Assamese
,
Manipuri
,
Bengali
,
Punjabi
,
Gujarati
,
Tamil
,
Telugu
,
Kannada