राष्ट्रपती कार्यालय
महावीर जयंतीच्या पूर्वसंध्येला राष्ट्रपतींनी दिल्या शुभेच्छा
Posted On:
05 APR 2020 6:55PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 5 एप्रिल 2020
राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी महावीर जयंतीच्या पूर्वसंध्येला शुभेच्छा दिल्या आहेत.
आपल्या संदेशात त्यांनी म्हटले आहे-
"महावीर जयंतीनिमित्त मी सर्व नागरिकांना विशेषतः जैन बांधवांना हार्दिक शुभेच्छा देतो.
भगवान महावीर यांची सत्य, अहिंसा, अस्तेय आणि अपरिग्रहची शिकवण प्रत्येक कळात आणि प्रत्येक व्यक्तीसाठी लागू होणारी आहे. या शिकवणीचे पालन करुन एका अशा समाजाची निर्मिती करता येऊ शकते जो सर्वसमावेशक व समतेवर अधारित असेल आणि जिथे सर्वांना समान संधी मिळू शकेल तसेच परस्पर समन्वय व सद्भाव याला बळ मिळेल.
या, विश्वात शांती, प्रेम, सदाचार व सौहार्द यांच्या प्रसारासाठी भगवान महावीर यांचे जीवन व त्यांच्या शिकवणूकीतून प्रेरणा घेऊ. सोबत वर्तमान स्थितीत आलेल्या वैश्विक संकट म्हणून उभ्या असलेल्या कोविड-19 विषाणूला लक्षात घेऊन, सर्व देशवासी सामजिक अंतरासहित सर्व सरकारी सूचनांचे पालन करु.
B.Gokhale/S.Nilkanth/P.Kor
(Release ID: 1611479)
अभ्यागत कक्ष : 98