मंत्रिमंडळ

कृषी आणि अन्न उद्योग क्षेत्रात सहकार्यासाठी भारत आणि युक्रेन यांच्यातल्या करारावर स्वाक्षऱ्या करण्याला मंत्रिमंडळाची मंजुरी

Posted On: 06 FEB 2019 9:50PM by PIB Mumbai

कृषी आणि अन्न उद्योग क्षेत्रात सहकार्यासाठी भारत आणि युक्रेन यांच्यातल्या करारावर स्वाक्षऱ्या करण्याला मंत्रिमंडळाने  मंजुरी दिली आहे.

कृषी आणि अन्न उद्योग क्षेत्रातल्या विविध विभागात या प्रस्तावित करारामुळे सहकार्य करण्यात येणार आहे.विवक्षित क्षेत्रात,सहकार्याचा आराखडा तयार करण्यासाठी आणि चर्चा करण्यासाठी तसेच अंमलबजावणी वर   देखरेख ठेवण्यासाठी, दोनही देशातल्या प्रतिनिधींचा समावेश असलेल्या संयुक्त कार्यकारी गटाची स्थापना करण्यात येणार आहे.करारावर स्वाक्षऱ्या करण्याच्या तारखेपासून हा करार अस्तित्वात येईल आणि त्याचा कालावधी 5 वर्षाचा राहील. हा करार संपुष्टात आणण्यासाठी एका पक्षाने सूचना दिल्यास ती प्राप्त झाल्यानंतर 6 महिन्यात करार संपुष्टातआणता येईल.  

***

BG/ NC  



(Release ID: 1563101) Visitor Counter : 75