मंत्रिमंडळ

भारत आणि अल्जेरिआ यांच्यातील अंतराळ विज्ञान, तंत्रज्ञान आणि वापर क्षेत्रातील सहकार्याबाबत कराराला मंत्रिमंडळाची मंजुरी

Posted On: 06 DEC 2018 9:24PM by PIB Mumbai

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाला भारत आणि अल्जेरिआ यांच्यातील अंतराळ विज्ञान, तंत्रज्ञान आणि वापर क्षेत्रातील सहकार्याबाबत कराराबाबत अवगत करण्यात आले. 19 सप्टेंबर 2018 रोजी या करारावर बंगळुरू इथे स्वाक्षऱ्या करण्यात आल्या होत्या.

ठळक वैशिष्ट्ये

या करारामुळे पृथ्वीचे रिमोट सेन्सिंग, उपग्रह दळणवळण, आणि उपग्रह आधारित दिशादर्शन, अंतराळ विज्ञान आणि ग्रहांचा शोध, अंतराळयानाचा, तसेच  अंतराळ तंत्रज्ञानाचा वापर यासारख्या संभाव्य क्षेत्रात सहकार्य लाभू शकेल.

या कराराद्वारे एक संयुक्त कृतीगट स्थापन केला जाईल ज्यामध्ये डीओएस/ इसरो आणि अल्जेरियन स्पेस एजन्सी (एएसएएल )चे सदस्य असतील, जे हा करार लागू करण्याची मुदत आणि उपायांसह एक कृती आराखडा तयार करतील.

प्रभाव :

या करारामुळे  भारत आणि अल्जेरिया यांच्यातील सहकार्य मजबूत होईल आणि पृथ्वीचे रिमोट सेन्सिंग, उपग्रह दिशादर्शन, अंतराळ विज्ञान आणि बाह्य अंतराळाचा शोध या क्षेत्रात नवीन संशोधनाला आणि त्याच्या संभाव्य वापराला चालना मिळेल.या करारामुळे मानवतेच्या कल्याणासाठी अंतराळ तंत्रज्ञान वापर क्षेत्रात संयुक्त उपक्रम विकसित होतील. अशा प्रकारे देशातील सर्व घटक आणि प्रांतांना लाभ मिळेल.

                                                              *****

B.Gokhale/ S. Kane


(Release ID: 1555038) अभ्यागत कक्ष : 104