मंत्रिमंडळ
आंतर शिस्तबद्धता सायबर-भौतिक प्रणाली’वरील राष्ट्रीय मिशनला मंजूरी
१५ तंत्रज्ञान नवीकरणीय हब, सहा उपयोजन नवीकरणीय हब आणि चार तांत्रिक अनुवाद संशोधन हब स्थापित करण्याला मंत्री मंडळाची मंजुरी
Posted On:
06 DEC 2018 9:14PM by PIB Mumbai
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील केंद्रीय मंत्रिमंडळाने, आज विज्ञान व तंत्रज्ञान विभागांतर्गत, ३६६० कोटी रुपये लागत मूल्य असलेल्या 'आंतर शिस्तबद्धता सायबर- भौतिक पद्धती'वरील (एनएम-आयसीपीएस) राष्ट्रीय मिशन सुरू करण्याला व त्याच्या अंमलबजावणीसाठी मंजुरी दिली असून ही योजना पाच वर्षांच्या कालावधी साठी आहे.
तपशीलः
मिशन समाजाच्या सातत्याने वाढत असलेल्या तांत्रिक गरजा पूर्ण करेल. आणि भावी पिढीच्या तंत्रज्ञानाच्या गरजा लक्षात घेऊन अग्रगण्य देशांचे आंतरराष्ट्रीय वर्तमान दृष्टिकोन , आणि रोड मॅप्सद्वारे देशांतर्गत, तंत्रज्ञान विकसित करण्यावर जोर देईल. या मिशनद्वारे विकासकांची अंमलबजावणी करण्यात येऊन खालील बाबी साध्य होतील:
-
सायबर फिजिकल सिस्टम्स (सीपीएस) आणि संबंधित तंत्रज्ञान, संपूर्ण देशात पोहोचण्यासाठी साहाय्य
-
विशिष्ट राष्ट्रीय / प्रादेशिक विषयांना संबोधित करण्यासाठी भारतात सीपीएस तंत्रज्ञान स्वीकारणे,
-
सीपीएस द्वारे भावी पिढयांना लागणारे कुशल मनुष्यबळ, आणि तंत्रज्ञान निर्मिती तसेच, उत्प्रेरक संशोधन, उत्प्रेरक जपवणुकीवर जोर
-
सीपीएसमध्ये उद्योजकता वाढविणे आणि इकोसिस्टमची सुरूवात वाढविणे ,
-
सीपीएस, तांत्रिक विकास, विज्ञान, तंत्रज्ञान आणि अभियांत्रिकी विषयातील उच्च शिक्षणामध्ये प्रगत संशोधन वाढविणे
-
भारताला इतर प्रगत देशांच्या तुलनेत सक्षम ठेवणे तसेच याद्वारे अनेक प्रत्यक्ष, अप्रत्यक्ष फायदे मिळविणे.
****
B. Gokhale
(Release ID: 1555037)
अभ्यागत कक्ष : 101