मंत्रिमंडळ

उपयोजित विज्ञान आणि औद्योगिक तंत्रज्ञान क्षेत्रामध्ये (अप्लाइड सायन्स अॅण्ड इंडस्ट्रियल टेक्नॉलॉजी) सहकार्य वाढविण्यासाठी भारत आणि दक्षिण कोरिया यांच्यात झालेल्या सामंजस्य कराराचा केंद्रीय मंत्रिमंडळाकडून आढावा

Posted On: 26 SEP 2018 4:09PM by PIB Mumbai

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाला, भारत आणि दक्षिण कोरिया यांच्यातील उपयोजित विज्ञान आणि औद्योगिक तंत्रज्ञान क्षेत्रामधील सहकार्यावरील सामंजस्य कराराची माहिती देण्यात आली. दक्षिण कोरियाच्या राष्ट्रपतींच्या भारत भेटीदरम्यान 9 जुलै 2018 रोजी नवी दिल्ली येथे या सामंजस्य करारावर स्वाक्षरी करण्यात आली. 

 शाश्वत विकास आणि राहणीमानात सुधारणा घडवून आणण्यासाठी उपयोजित विज्ञान आणि औद्योगिक तंत्रज्ञान क्षेत्रामध्ये द्विपक्षीय सहकार्य वाढविणे हा या कराराचा उद्देश आहे.

 ***

N.Sapre/S.Tupe



(Release ID: 1547355) Visitor Counter : 69