शिक्षण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने जिल्ह्यांमधील शालेय  शिक्षण व्यवस्थेची कामगिरीनिहाय वर्गवारी करणाऱ्या निर्देशांकाचा, 2020-21 आणि 2021-22 या वर्षांसाठीचा, एकत्रित अहवाल केला जारी

Posted On: 09 JUL 2023 5:13PM by PIB Mumbai

 

केंद्रीय शिक्षण मंत्रालयाच्या, शालेय शिक्षण आणि साक्षरता विभागाने (DoSE&L) आज, जिल्ह्यांमधील शालेय शैक्षणिक व्यवस्थेची कामगिरीनिहाय वर्गवारी करणाऱ्या निर्देशांकाचा, 2020-21 आणि 2021-22 या वर्षांसाठीचा, एकत्रित अहवाल (PGI-D) जारी केला. या अहवालात, जिल्हा स्तरावरील शालेय शिक्षण व्यवस्थेच्या सर्वंकष विश्लेषणासाठी निर्देशांक तयार करून, या शिक्षण व्यवस्थेच्या कामगिरीचे मूल्यांकन केले जाते. 

सुमारे 14 लाख 90 हजार शाळा, 95 लाख शिक्षक आणि विविध सामाजिक-आर्थिक पार्श्वभूमी असलेले सुमारे 26 कोटी 50 लाख विद्यार्थी यांना सामावून घेतलेली भारतीय शिक्षण व्यवस्था, जगातील सर्वात मोठ्या शिक्षण व्यवस्थांपैकी एक आहे.  शालेय शिक्षण आणि साक्षरता विभागाने  या आधी, राज्यांसाठी शिक्षण व्यवस्थेचा कामगिरी वर्गवारी निर्देशांक (परफॉर्मन्स ग्रेडिंग इंडेक्स-PGI) तयार केला आणि संदर्भ वर्ष 2017-18 ते 2020-21 साठी अहवाल जारी केला. या राज्य कामगिरी वर्गवारी निर्देशांकाच्या यशावर आधारीत, सर्व जिल्ह्यांच्या कामगिरीची वर्गवारी करण्यासाठी, आता जिल्ह्यांसाठी 83-निर्देशक आधारीत पीजीआय-डी ची रचना करण्यात आली आहे. यामध्ये  जिल्ह्यांद्वारे, ऑनलाइन पोर्टलच्या माध्यमातून माहिती भरली जाते.  पीजीआय-डी मुळे राज्याच्या शिक्षण विभागांना, शिक्षण व्यवस्थेत असलेली जिल्हा स्तरावरील तफावत ओळखण्यात आणि शिक्षण व्यवस्थेचे विकेंद्रीकरण करून आपली कामगिरी सुधारण्यात मदत होईल अशी अपेक्षा आहे.  निर्देशांकानुसार मिळालेले पीजीआय गुणांकन, जिल्ह्याने कुठल्या बाबतीत  सुधारणा करणे आवश्यक आहे ते वेगवेगळ्या निर्देशकानुसार दर्शवते.  2018-19 आणि 2019-20 साठी पीजीआय-डी अहवाल, यापूर्वी  जारी करण्यात आला आहे. सध्याचा अहवाल हा 2020-21 आणि 2021-22 चा एकत्रित अहवाल आहे.

पीजीआय-डी च्या संरचनेत, विविध प्रकारच्या मुल्यांकनासाठी 83 निर्देशक ठरवण्यात आले असून त्यांचे एकूण मूल्यमापन 600 गुणांमध्ये केले आहे. या 83 निर्देशकांची  6 गटांमध्ये विभागणी   केली आहे. मिळालेले एकंदर परिणामवर्गातून केल्या जाणाऱ्या अध्यापनाची परिणामकारकता, पायाभूत सुविधा आणि विद्यार्थ्यांचे हक्क, शाळा सुरक्षा आणि बाल संरक्षण, डिजिटल अध्ययन आणि प्रशासन प्रक्रिया, हे ते सहा गट आहेत. हे सहा गट  पुढे 12 भागांमध्ये विभागले  आहेत. पीजीआय-डी ने जिल्ह्यांसाठी  दहा श्रेणी निश्चित केल्या आहेत.  उदा. दक्ष, ही सर्वोत्तम श्रेणी आहे. सहा गटांपैकी एका गटात किंवा एकंदर सर्व सहा गट मिळून ज्या जिल्ह्याला 90% पेक्षा जास्त गुण मिळतात त्यांना दक्ष ही श्रेणी दिली जाते.  दहा टक्क्यांपर्यंत गुण मिळणाऱ्या जिल्ह्यांना आकांक्षी-3 ही श्रेणी दिली जाते आणि ही श्रेणी सर्वात तळाची आहे.  शालेय शिक्षण व्यवस्थेत सुधारणा घडवून आणण्यासाठी नेमक्या कुठल्या क्षेत्रात बदल घडवून आणणे आवश्यक आहे ते प्राधान्य क्रमाने ठरवून सुधारणेची अधिकाधिक चांगली श्रेणी प्राप्त करण्यासाठी जिल्ह्यांना मदत करणे, हे पीजीआय-डी चे अंतिम उद्दिष्ट आहे.

2020-21 आणि 2021-22 साठीचा, पीजीआय-डी एकत्रित अहवाल इथे मिळवता येईल https://www.education.gov.in/statistics-new?shs_term_node_tid_depth=396&Apply=Apply

***

N.Chitale/A.Save/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1938324) Visitor Counter : 665