संरक्षण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

लेफ्टनंट जनरल एमव्ही सुचिंद्र कुमार यांनी लष्कराच्या उपप्रमुखपदाची सूत्रे स्वीकारली

Posted On: 01 MAR 2023 4:13PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 1 मार्च 2023

लेफ्टनंट जनरल एम व्ही सुचिंद्र कुमार यांनी आज (1 मार्च 2023) लेफ्टनंट जनरल बीएस राजू यांच्याकडून लष्कराच्या उपप्रमुखपदाची सूत्रे स्वीकारली. कुमार यांनी आज जयपूर स्थित सप्त शक्ती कमांडची सूत्रे हाती घेतली आहेत.

लष्कराचे उपप्रमुख म्हणून पदभार स्वीकारण्यापूर्वी, लेफ्टनंट जनरल एमव्ही सुचिंद्र कुमार हे लष्कराच्या मुख्यालयात सैन्य उपप्रमुख (रणनीती) या पदावर कार्यरत होते. त्यांच्या अलीकडील नियुक्तींमध्ये गुप्तचर मोहिमा, दलांची रचना, ऑपरेशनल लॉजिस्टिक आणि तंत्रज्ञान अशा विविध  कामाचा अनुभव त्यांनी घेतला आहे.

विजापूरची सैनिकी शाळा आणि राष्ट्रीय संरक्षण अकादमीचे माजी विद्यार्थी असलेले सुचिंद्र कुमार यांची जून 1985 मध्ये 1 आसाम रेजिमेंटमध्ये नियुक्ती करण्यात आली. त्यांनी 59 राष्ट्रीय रायफल्स बटालियन (ASSAM), एक पायदळ ब्रिगेड आणि नियंत्रण रेषेवरील पायदळ विभागाचे नेतृत्व केले आहे. नॉर्दर्न कमांडमध्ये ते एक सक्रिय व्हाईट नाइट कॉर्प्स होते.

महूच्या इन्फंट्री स्कूलमधील कालावधी, कंबोडियातील संयुक्त राष्ट्र क्षेत्रामध्‍ये  वरिष्ठ मोहीम अधिकारी म्हणून कार्य, लष्करी सचिव शाखेतील कर्नल (पॉलिसी), लेसोथो येथील भारतीय सैन्य प्रशिक्षण दल, ईस्टर्न थिएटरमधील कॉर्प्सचे कर्मचारी (ऑपरेशन), लष्करी मुख्यालयातील गुप्तचर विभागाचे अतिरिक्त महासंचालक आणि महासंचालक अशा विविध ठिकाणी आणि वेगवेगळ्या पदांवर काम केलं आहे.

वेलिंग्टनचे डिफेन्स सर्व्हिसेस स्टाफ कॉलेज, महू येथील  हायर कमांड कोर् आणि नवी दिल्ली राष्‍ट्रीय संरक्षण महाविद्यालय, येथे त्यांनी शिक्षण घेतले आहे. तसेच सुचिंद्र कुमार यांनी  श्रीलंकेतील ‘दक्षिण आशियातील सहकारी सुरक्षा’ आणि इजिप्तमधील ‘युनायटेड नेशन्स सीनियर मिशन लीडर्स कोर्स’ हे अभ्यासक्रमही पूर्ण केले आहेत. त्यांनी लिहिलेले लष्करी शोधनिबंध अनेक व्यावसायिक नियतकालिकांमध्ये प्रकाशित झाले आहेत.

 

 

 

S.Bedekar/P.Jambhekar/P.Malandkar

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 

 

 



(Release ID: 1903371) Visitor Counter : 270