Infrastructure
घरगुती पीएनजी जोडण्यांना प्रोत्साहन देण्यासाठी सवलत योजना
प्रविष्टि तिथि:
13 SEP 2026 11:05 AM
प्रत्येक घरासाठी स्वच्छ आणि परवडणाऱ्या दरात पाईपने स्वयंपाकाचा गॅस
आढावा
पाईप ने नैसर्गिक गॅस पुरवठा- म्हणजेच पीएनजी चा विस्तार हा भारताच्या घरगुती गॅस साठी स्वच्छ ऊर्जा आणि ऊर्जा सुरक्षेकडे होणाऱ्या परिवर्तनातील एक महत्वाचा भाग आहे घरगुती वापरासाठी पीएनजी चा पुरवठा, हा सीजीडी म्हणजेच शहर गॅस वितरण व्यवस्थेचा एक भाग आहे. या सीजीडी नेटवर्क मध्ये, पाईपलाईन्स आणि इतर संलग्न सुविधा घराघरात आणि व्यावसायिक आस्थापनांना तसेच औद्योगिक कंपन्यांना प्रदान करणे, अशा गोष्टींचा समावेश आहे. पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायु नियामक बोर्ड- पीएनजीआरबी ने प्राधिकृत केलेल्या संस्था, हे विकसित करतात. पीएनजीआरबी ने 309 भौगोलिक क्षेत्रातील संस्थांना असे प्राधिकृत केले आहे.
एकत्रितपणे बघता, ही सर्व क्षेत्रे, भारताच्या संपूर्ण प्रदेशाचा भाग आहेत. 18 ऑगस्ट 2026 पर्यंत, 1.74 कोटी इतकी घरगुती पीएनजी जोडण्या देशभरात देण्यात आल्या आहेत.
पीएनजी जोडण्यांची व्याप्ती आणखी वाढवण्यासाठी, 18 ऑगस्ट 2026 रोजी, घरगुती पीएनजी जोडण्यांना प्रोत्साहन देण्यासाठी, सवलत योजना जाहीर करण्यात आली. ही योजना, एक सप्टेंबर 2026 रोजीपासून लागू झाली.
योजनेविषयी—
पीएनजी जोडण्यांना प्रोत्साहन देण्यासाठी च्या सवलत योजनेचे उद्दिष्ट, सक्रिय घरगुती पीएनजी जोडण्यांच्या विस्ताराला गती देणे हे आहे. याचा उद्देश, घराघरांमध्ये, स्वच्छ, सुरक्षित आणि परवडणाऱ्या दरात स्वयंपाकाचा गॅस, पाईप पुरवठ्याद्वारे पोहोचवणे हा आहे. या योजनेअंतर्गत, सीजीडी केंद्रांना, अनबिल्ड म्हणजेच, वापरात नसलेल्या जोडण्या सक्रिय, म्हणजेच बिल्ड (billed) जोडण्यांमध्ये परावर्तित केल्यावर, सवलती दिल्या जातात. तसेच, पीएनजी नेटवर्कचा नव्या क्षेत्रात विस्तार करण्यासही या अंतर्गत प्रोत्साहन दिले जाते. ही योजना, सहा महिन्यांच्या कालावधीत, दोन टप्प्यात राबवली जाणार आहे.

या योजनेअंतर्गत प्रत्येक भौगोलिक क्षेत्रासाठी किमान जोडण्यांची संख्या निश्चित करण्यात आली आहे. कामगिरीच्या कालावधीत पात्र सीजीडी संस्थांनी या मर्यादेपेक्षा अधिक, बिल आकारल्या जाणाऱ्या घरगुती गॅस जोडण्यांची यादी द्यायची आहे. अशा प्रत्येक अतिरिक्त जोडणीसाठी संबंधित संस्थेला 200 स्टँडर्ड क्युबिक मीटर (SCM) गॅसचे अतिरिक्त वाटप मिळेल. हा गॅस देशांतर्गत उत्पादित प्रशासित किंमत यंत्रणा अंतर्गत येणारा गॅस असून, त्याची किंमत तुलनेने कमी आहे.
या अतिरिक्त जोडणीमुळे, एलएनजीची जागा पीएनजी गॅस घेईल. सीजीडी संस्था, सध्या, त्यांच्या कॉम्प्रेस्स्ड नॅच्युरल गॅस ( वाहतुकीचा) साठी एलएनजी खरेदी करतात. त्याला जर स्वस्त आशा एपीएम गॅस ने पर्याय दिला, तर गॅसची स्त्रोतांची किंमत कमी होईल.
घरगुती गॅस जोडणीसाठी केलेल्या भांडवली खर्चाची परतफेड होण्यासाठी लागणारा कालावधी त्यामुळे कमी होण्याची अपेक्षा आहे. हा कालावधी सुमारे दहा वर्षांवरून जवळपास तीन वर्षांपर्यंत कमी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे कंपन्यांना अधिक वेगाने घरगुती गॅस जोडण्या देण्यासाठी व्यावसायिक पातळीवर भक्कम प्रोत्साहन मिळेल.
घरगुती वापरासाठी पीएनजीचे फायदे :
पीएनजी मुळे घरगुती वापरकर्त्यांना वापरण्यास सुलभता, खर्चात बचत आणि अखंडित उपलब्धता यांसह अनेक महत्त्वाचे फायदे मिळतात. घरगुती वापरकर्त्यांसाठी PNG चे प्रमुख फायदे पुढीलप्रमाणे आहेत:
- सुरक्षा आणि सुरक्षितता: हा गॅस भूमिगत पाईपलाईनच्या द्वारे नेला जातो, घरी पोहोचला, त्यामुळे सिलेंडर्स ठेवण्याची किंवा त्यांची हाताळणी करण्याची गरज नसते. हवेपेक्षाही हलके असलेला हा गॅस, जर कधी गळती झालीच, तर लगेच, वर हा वायू वर जाऊन नाहीसा होतो.
- दैनंदिन सुविधा : याची नोंदणी करावी लागत नही, त्याचा साठा, सिलेंडर्स बदलणे यांची गरज नसते. गॅस, चोवीस तास घरी उपलब्ध असतो. आपण किती वापर करतो, त्याची मीटर मध्ये नोंद येऊन, त्यानुसार बिल आकारले जाते, म्हणजेच वीज बील किंवा पाण्याच्या बिला प्रमाणेच त्याची आकारणी होते.
- कमी खर्च: घरगुती ग्राहक प्रत्यक्षात वापरलेल्या गॅससाठीच पैसे देतो. प्रति युनिट ऊर्जेच्या आधारावर पीएनजी ची किंमत सामान्यतःएलपीजी पेक्षा कमी असते. त्यामुळे कालांतराने मासिक इंधन खर्चात घट होते.
- स्वच्छ पर्यावरण: पारंपरिक स्वयंपाकाच्या इंधनांच्या तुलनेत पीएनजी अधिक स्वच्छ जळतो आणि कमी प्रदूषक उत्सर्जित करतो. त्यामुळे घरातील हवा अधिक स्वच्छ राहते आणि कार्बन उत्सर्जनही कमी होते.
- सुनिश्चित पुरवठा: पाइपलाइनद्वारे गॅसचा सतत पुरवठा होत असल्याने सिलिंडर वितरणाशी संबंधित वाहतूक आणि पुरवठ्याच्या प्रक्रियेची आवश्यकता राहत नाही. उंच इमारती आणि दाटीवाटीच्या शहरी वसाहतींमधील घरांना याचा सर्वाधिक फायदा होतो.
पीएनजी च्या विस्तारासाठी उपक्रम
पीएनजीच्या विस्ताराला जलद मंजुरी, कररचनेचे सुसूत्रीकरण आणि पायाभूत सुविधांच्या विकासाची प्रक्रिया अधिक सुलभ करण्यासाठी करण्यात आलेल्या उपाययोजनांद्वारे पाठबळ दिले जात आहे. डिजिटल प्लॅटफॉर्म आणि जनजागृतीच्या उपक्रमांमुळे घरगुती ग्राहकांसाठी पीएनजी कडे संक्रमण अधिक सोपे, जलद आणि सुलभ होत आहे:
- नियमन परवानग्या यांचे सुलभीकरण : नैसर्गिक वायू आणि पेट्रोलियम उत्पादनांचे वितरण (पाइपलाइन आणि इतर सुविधांचे टाकणे, बांधकाम, संचालन आणि विस्तार) आदेश, 2026 अंतर्गत जलद मंजुरीची रूपरेषा जारी करण्यात आली आहे. या आदेशाद्वारे पाइपलाइनसाठीच्या मार्गाधिकारासाठी एकसमान शुल्काचीही तरतूद करण्यात आली आहे. या शुल्कामध्ये पीएनजी पाइपलाइन टाकण्यासाठी जमीन किंवा सार्वजनिक क्षेत्राचा वापर करण्याची परवानगी समाविष्ट आहे. आता अर्जांना प्राधान्याने आणि निश्चित कालमर्यादेत प्रक्रिया करून मंजुरी दिली जाईल.
- मूल्यवर्धित करात कपात : नैसर्गिक गॅसवर लावल्या जाणाऱ्या मूल्यवर्धित करात 5 टक्के कपात करण्यासाठी राज्यांना प्रोत्साहन दिले जात आहेत. अनेक राज्यांनी आधीच हा निर्णय घेतला आहे, ज्यामुळे पाईप गॅस ग्राहकांसाठी स्वस्त झाली आहे.
- राष्ट्रीय पीएनजी ड्राइव्ह 2.0: ही राष्ट्रव्यापी मोहीम एक जानेवारी 30 जून 2026 या कालावधीत डीपीएनजी जोडण्या संपूर्ण भौगोलिक प्रदेशात राबवण्यात आली.
- एकात्मिक पीएनजी नोंदणी पोर्टल : एकल खिडकी डिजिटल मंच विकसित केले जात आहे. यामुळे नवीन गॅस जोडणीसाठी अर्ज करणे आणि त्याची स्थिती पाहणे अधिक सोपे आणि जलद होईल.
स्वच्छ, जोडलेल्या घरांच्या दिशेने वाटचाल
घराघरात स्वच्छ स्वयंपाकाच्या इंधनाची उपलब्धता प्रत्येक कुटुंबाच्या सोयी, आरोग्य आणि सन्मानात भर घालते. आता लागू झालेली ही नवीन योजना गॅस कंपन्यांच्या व्यावसायिक हितसंबंधांना या राष्ट्रीय उद्दिष्टाशी जोडते. पाइपलाइन अधिकाधिक भागांपर्यंत आणि अधिकाधिक स्वयंपाकघरांपर्यंत पोहोचत गेल्याने सिलिंडरवरील अवलंबित्व हळूहळू कमी होईल. त्यामुळे भारतातील दैनंदिन जीवनाचा नैसर्गिक भाग म्हणून पाइपद्वारे पुरवठा होणारा गॅस लवकरच अधिक व्यापक होण्याची अपेक्षा आहे.
संदर्भ :
पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालय:
https://www.pib.gov.in/PressReleaseDetail.aspx? PRID=2301012®=3&lang=1
https://www.pib.gov.in/PressReleasePage.aspx?PRID=2252308&lang=1
https://sansad.in/getFile/lsapps/loksabhaquestions/annex/188/AU1952_UgNJ5G.pdf?source=lsapps
Incentive Scheme for Promotion of Domestic PNG Connections
***
Neha Kulkarni / Radhika Aghor / Dinesh Yadav
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(तथ्य सामग्री आईडी: 151079)
आगंतुक पटल : 6
Provide suggestions / comments