उपराष्ट्रपती कार्यालय
azadi ka amrit mahotsav

उपराष्ट्रपती सी.पी. राधाकृष्णन यांनी श्री गुरू नानक देव जी यांच्या प्रकाश पर्वानिमित्त गुरुद्वारा रकाब गंज साहिबला दिली भेट

Posted On: 24 NOV 2026 1:26PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 24 नोव्‍हेंबर 2026

 

श्री गुरू नानक देव जी यांच्या प्रकाश पर्वानिमित्त आज उपराष्ट्रपती सी.पी. राधाकृष्णन यांनी नवी दिल्लीतल्या गुरुद्वारा रकाब गंज साहिबला भेट देऊन प्रार्थना केली. श्री गुरू ग्रंथ साहिब जी यांच्याप्रती आदरभावना व्यक्त करत त्यांनी रुमाला साहिबदेखील अर्पण केले. 

उपराष्ट्रपतींनी या पवित्र प्रसंगी सर्वांना हार्दिक शुभेच्छा दिल्या. 

उपराष्ट्रपतींनी आपल्या संदेशात म्हटले आहे :

"श्री गुरू नानक देव जी यांच्या प्रकाश पर्वानिमित्त मी सर्वांना हार्दिक शुभेच्छा देतो. 

श्री गुरु नानक देव जी यांची सत्य, समानता, करुणा, निस्वार्थ सेवा आणि विश्वबंधुत्वाची कालातीत  शिकवण आजही मानवजातीला मार्ग दाखवत आहे आणि आपल्याला शांतता, सुसंवाद आणि परस्पर आदर यांवर आधारित समाज घडवण्यासाठी प्रेरणा देत आहे.

त्यांचा ‘किरत करो, वंड छको आणि नाम जपो’, हा संदेश आपल्याला सदाचारी, सन्मानपूर्वक आणि मानवतेची सेवा करत जगण्याचे मार्गदर्शन करतो."

यावेळी केंद्रीय मंत्री हरदीप सिंह पुरी, दिल्लीचे नायब राज्यपाल तरणजित सिंह संधू, दिल्लीचे मंत्री मनजींदर सिंह  सिरसा आणि इतर मान्यवर उपस्थित होते.

 

* * *

राधिका अघोर/सोनाली काकडे/दर्शना राणे

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2340783) अभ्यागत कक्ष : 10