इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय
Posted On:
19 NOV 2026 2:38PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 19 नोव्हेंबर 2026
भारत सरकारच्या इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाच्या (MeitY) अंतर्गत येणाऱ्या डिजिटल इंडिया कॉर्पोरेशनच्या (DIC) डिजिटल इंडियाच्या भाषिणी विभागाने (DIBD), 17–18 नोव्हेंबर 2026 रोजी नवी दिल्लीतील इंडिया हॅबिटॅट सेंटर येथे आयोजित 'दक्षिण दिन-2026 या दोन दिवसीय उच्चस्तरीय धोरण संवादात सहभाग घेतला होता. भारत सरकारच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या सहकार्याने विकसनशील देशांसाठी संशोधन आणि माहिती प्रणाली (RIS) द्वारे आयोजित होणाऱ्या या कार्यक्रमात, दक्षिण-दक्षिण सहकार्याच्या उदयोन्मुख क्षेत्रांवर विचारविनिमय करण्यासाठी भारत, आफ्रिका आणि इतर भागीदार देशांमधील धोरणकर्ते, राजनैतिक, तज्ञ आणि संस्थात्मक प्रतिनिधी एकत्र येतात.
या उपक्रमातील उद्घाटन सोहळ्याच्या आणि कार्यक्रमाच्या पहिल्या दिवशी प्रदर्शनातील एका स्टॉलद्वारे भाषिणीने या कार्यक्रमात आपल्याकडे सर्वांचे लक्ष वेधून घेतले.या स्टॉलद्वारे भाषिणीची बहुभाषिक कृत्रिम बुद्धिमत्तेची एआय परिसंस्था प्रदर्शित करण्यात आली आणि कृत्रिम बुद्धिमत्तेवर (एआय) आधारित भाषा तंत्रज्ञान सर्वसमावेशक डिजिटल प्रवेश कशाप्रकारे सक्षम करू शकते, सार्वजनिक सेवा वितरण मजबूत करू शकते आणि भाषिक सीमा ओलांडून संवाद सुलभ करू शकते, हे यावेळी दाखवून देण्यात आले.

भाषिणी टीम समूहातील तंत्रज्ञांनी या तंत्रज्ञानाच्या वापराची विविध उदाहरणे आणि थेट प्रात्यक्षिके सादर करून, अभ्यागतांना बहुभाषिक अनुवाद, वाक्यांची ओळख, वाक्यांचे पृथक्करण,लिप्प्यांकन, लिप्यंतरण आणि आवाजाद्वारे संवाद यांसारख्या विविध व्यासपीठांच्या क्षमतांचा परिचय करून दिला.प्रात्यक्षिकांद्वारे प्रशासन, शिक्षण, आरोग्यसेवा, बँकिंग, कायदेशीर सेवा आणि इतर नागरिक-केंद्रित क्षेत्रांमध्ये या तंत्रज्ञानाच्या व्यावहारिक उपयोगांवर प्रकाश टाकण्यात आला, तसेच लँग्वेज एआय (Language AI) लोकांच्या पसंतीच्या भाषांमध्ये माहिती आणि डिजिटल सेवा कशाप्रकारे अधिक सुलभ करू शकते हे ही दाखवण्यात आले.

या प्रदर्शनाने मान्यवर व्यक्ती, आंतरराष्ट्रीय प्रतिनिधी, धोरणकर्ते आणि इतर हितसंबंधितांना एकमेकांशी संवाद साधण्याची संधी उपलब्ध करून दिली, तसेच डिजिटल सर्वसमावेशकतेला चालना देण्यासाठी आणि संस्थात्मक सहकार्य मजबूत करण्यासाठी बहुभाषिक एआयच्या क्षमतेवर प्रकाश टाकला.आपल्या सादरीकरणाद्वारे, 'भाषिनी'ने डिजिटल सार्वजनिक पायाभूत सुविधांपैकी (DPI) एक महत्त्वाचा घटक म्हणून लँग्वेज एआयच्या भूमिकेवर प्रकाश टाकला, ज्याची उपयुक्तता राष्ट्रीय सीमांच्या पलीकडे आणि विविध भाषिक संदर्भांमध्ये विस्तारलेली आहे.
भारत सरकारचे माननीय परराष्ट्र व्यवहार राज्यमंत्री कीर्ती वर्धन सिंह यांनी 'भाषिणी'च्या स्टॉलला दिलेली भेट, हे या कार्यक्रमाचे एक प्रमुख आकर्षण होते.यावेळी मंत्रीमहोदयांनी टीमशी संवाद साधला, तसेच 'भाषिणी'च्या बहुभाषिक एआय क्षमतांची प्रात्यक्षिके पाहिली आणि 'भाषिणी' हे त्यांनी वापरलेले एक चांगले व उपयुक्त व्यासपीठ असल्याचे मत व्यक्त केले.


डिजिटल इंडियाच्या भाषिणी विभाग (DIBD) बद्दल माहिती
इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय (MeitY) अंतर्गत असलेल्या डिजिटल इंडिया कॉर्पोरेशन (DIC) मधील डिजिटल इंडिया भाषानी विभाग (DIBD), एआय-सक्षम बहुभाषिक डिजिटल समावेशनासाठी एक राष्ट्रीय परिसंस्था तयार करत आहे. भाषानी एक 'भाषा-प्रथम डिजिटल सार्वजनिक पायाभूत सुविधा' तयार करत आहे, जी सरकारी विभाग, डेव्हलपर्स, संशोधक आणि इतर भागधारकांना बहुभाषिक एआय ॲप्लिकेशन्स आणि सेवा तयार करण्यास व तैनात करण्यास सक्षम करते.भाषिणीद्वारे 36 भारतीय भाषांतील मजकूर , 23 भारतीय भाषांतील ध्वनी आणि 35 आंतरराष्ट्रीय भाषांना समर्थन दिले गेले देते, ज्यामुळे प्रशासकीय आणि सार्वजनिक डिजिटल सेवांमध्ये भाषा तंत्रज्ञानाचे एकजिनसीकरण करणे शक्य होते. तिच्या परिसंस्थेमध्ये अनुवाद, वाक्यांच्या प्रकारांची ओळख, वाक्याचे पृथक्करण, लिप्यंतरण आणि इतर भाषा सेवांसाठीच्या तंत्रज्ञानाचा समावेश आहे, जेणेकरून भारतातील भाषिक विविधतेत देखील डिजिटल माहिती आणि सेवा अधिक सुलभपणे प्रसारित करण्यात मदत होते.
नितीन फुल्लुके/संपदा पाटगावकर/प्रिती मालंडकर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai