Posted On:
18 NOV 2026 6:38PM by PIB Mumbai
काश्मीर खोऱ्यातील लष्कर या दहशतवादी संघटनेचा शेवटचा ज्ञात स्थानिक दहशतवादी लतीफ भट याला आज सकाळी कुलगाम येथील कारवाईत ठार केल्याबद्दल केंद्रीय गृह व सहकार मंत्री अमित शाह यांनी जेकेपीचे शूर जवान, सेनादल, सीआरपीएफ आणि गुप्तहेर यंत्रणांचे अभिनंदन केले आहे.
एक्स या समाजमाध्यमावरील संदेशात केंद्रीय गृह व सहकार मंत्री अमित शाह यांनी लिहीले आहे की, “जेकेपी, भारतीय सेना, सीआरपीएफ आणि गुप्तहेर यंत्रणा यांच्या समन्वयित प्रयत्नांमुळे काश्मीर खोऱ्यातील लष्कर’चा शेवटचा ज्ञात दहशतवादी लतीफ भट कुलगाम येथील कारवाईत आज सकाळी मारला गेला. त्याच्यासोबतचा एक दहशतवादी उमर निसार काल कुलगाम येथील कारवाईत ठार झाला. या संपूर्ण कारवाईमध्ये उच्च स्तरीय समन्वयाचा परिणाम दिसून आला. जेकेपीचे शूर जवान, सेनादल, सीआरपीएफ आणि गुप्तहेर यंत्रणांना देशाचा सलाम!”
***
Shailesh Patil / Surekha Joshil / Madhura Nerurkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai