पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

मनिला येथे आयोजित आसियान शिखर परिषदेच्या अनुषंगाने पंतप्रधानांनी फिलिपाईन्सच्या राष्ट्राध्यक्षांची भेट घेतली

Posted On: 17 NOV 2026 4:29PM by PIB Mumbai

मनिला येथे आयोजित आसियान शिखर परिषदेच्या अनुषंगाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज फिलिपाईन्स प्रजासत्ताकाचे राष्ट्राध्यक्ष फर्डिनांड आर.मार्कोस ज्युनिअर यांची भेट घेतली.

यावर्षी आसियानचे अध्यक्षपद यशस्वीपणे भूषवल्याबद्दल पंतप्रधानांनी फिलिपाईन्सचे अभिनंदन केले. वर्ष 2024 पासून भारतासाठी राष्ट्र समन्वयकाची भूमिका निभावल्याबद्दल तसेच आसियान-भारत संबंध मजबूत करण्यासाठी दिलेल्या सातत्यपूर्ण पाठींब्याबद्दल पंतप्रधानांनी फिलिपाईन्सची प्रशंसा केली.

दोन्ही नेत्यांनी सप्टेंबर 2026 मध्ये नवी दिल्ली येथे आयोजित ब्रिक्स शिखर परिषदेच्या अनुषंगाने झालेल्या त्यांच्या भेटीची आठवण काढली. या भेटीसाठी पंतप्रधान मोदी यांनी आसियानचे अध्यक्ष या नात्याने राष्ट्राध्यक्ष मार्कोस ज्युनिअर यांना उपस्थित राहण्याचे निमंत्रण दिले होते. ऑगस्ट 2025 मध्ये राष्ट्राध्यक्ष मार्कोस ज्युनिअर यांच्या भारत भेटीदरम्यान दोन्ही देशांमध्ये स्थापन झालेल्या धोरणात्मक भागीदारीअंतर्गत संरक्षण आणि सुरक्षा, अंतराळ क्षेत्र, रेल्वेच्या पायाभूत सुविधा, वित्ततंत्रज्ञान तसेच व्यापार आणि गुंतवणूक यांसारख्या विविध क्षेत्रांमध्ये द्विपक्षीय सहकार्यातील वाढलेल्या गतीची दोन्ही नेत्यांनी प्रशंसा केली. परस्पर हिताच्या महत्वाच्या प्रादेशिक आणि जागतिक मुद्यांवर या नेत्यांनी वैचारिक देवाण-घेवाण केली.



***


Nilima Chitale / Sanjana Chitnis / Madhura Nerurkar

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2337695) अभ्यागत कक्ष : 10