57th International Film Festival of India 2026
20 – 28 Nov 2026

वेव्हज् फिल्म बाजार साजरा करत आहे भारतीय सिनेमाला जागतिक चित्रपट उद्योगाशी जोडण्याच्या द्विदशकपूर्तीचा उत्सव

Posted On: 15 NOV 2026 2:40PMby PIB MumbaiRelease ID: 2336683Views: 3

 

वेव्हज् फिल्म बाजार कला क्षेत्रातील सिनेमॅटिक देवाणघेवाण, सहकार्य आणि व्यावसायिक संधींसाठी सर्वात महत्त्वाच्या व्यासपीठांपैकी एक असलेल्या वेव्हज फिल्म बाजारच्या 20 व्या आवृत्तीचे 20 ते 24 नोव्हेंबर 2026 दरम्यान गोव्यातील ‘ताज सिदादे दे गोवा होरायझन’ येथे आयोजन होणार आहे. इफ्फी अर्थात भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या 57 व्या आवृत्तीसोबतच याचे आयोजन होईल.

वेव्हज फिल्म बाजार अंतर्गत होणाऱ्या प्रमुख उपक्रमांमध्ये सहनिर्मिती बाजाराचा  (को-प्रॉडक्शन मार्केट) समावेश आहे, ज्यायोगे निवडक पूर्ण लांबीचे चित्रपट आणि माहितीपटांना आंतरराष्ट्रीय निर्माते आणि वित्तपुरवठादारांसोबत जोडले जाते; तसेच एनएफडीसीचा पटकथाकार विभाग (स्क्रीनरायटर्स लॅब), जो उदयोन्मुख लेखन प्रतिभेला प्रोत्साहन देतो; आणि प्रगतीपथावरील कामाला( वर्क-इन-प्रोग्रेस लॅब), त्यांच्या प्रकल्पांसाठी अधिक उत्तमपणे परिष्कृत करणाऱ्या चित्रपट निर्मात्यांना तज्ज्ञांचा अभिप्राय मिळवायला मदत  होते.प्रेक्षागृह ( व्ह्यूइंग रूम), बाजारातील प्रक्षेपण (मार्केट स्क्रीनिंग्ज) आणि निर्मिती विभाग (प्रोड्युसर्स लॅब) हे चित्रपट उद्योगातील नेटवर्किंग, प्रकल्प विकास आणि संभाव्य खरेदीदार व वितरकांशी जोडले जाण्याच्या अधिक संधी उपलब्ध करून त्याला  चालना देतात.

माहिती देणारे मंच (नॉलेज सिरीज) उदयोन्मुख प्रवाह, वितरण, व्यवसाय प्रारूपे आणि आंतरराष्ट्रीय सहकार्य यांवर चर्चा करण्यासाठी उद्योग क्षेत्रातील धुरीणांना एकत्र आणतात.विविध देशांची आणि राज्यांची दालने, तंत्रज्ञान प्रदर्शने आणि बाजारपेठेतील स्टॉल्स सीमापार भागीदारीला अधिक प्रोत्साहन देतात आणि जागतिक दृकश्राव्य उद्योगातील संधी प्रदर्शित करतात.

दक्षिण आशियायी कथांतील कथनप्रक्रियेला प्रोत्साहन देण्यासाठी राष्ट्रीय चित्रपट विकास महामंडळाने (NFDC) 2007 मध्ये सुरू केलेला 'फिल्म बाजार' हा उपक्रम चित्रपट निर्माते, निर्माते, वित्तपुरवठादार, वितरक, विक्री प्रतिनिधी आणि महोत्सव आयोजकांना जोडणारा एक महत्त्वाचा आंतरराष्ट्रीय मंच म्हणून विकसित झाला आहे.गेल्या काही वर्षांमध्ये, याने शिप ऑफ थिसियस (2012), अनहे घोडे दा दान (2011), मिस लवली (2012), किस्सा (2013), द लंचबॉक्स (2013), लायर्स डाइस (2013), कोर्ट (2014), तितली (2014), मार्गारीटा विथ अ स्ट्रॉ (2014), चौथी कूट (2015), दम लगा के हैशा (2015), तिथी (2015), न्यूटन (2017), मंटो (2018), फायर इन द माउंटन्स (2021), इन द बेली ऑफ द टायगर (2024), गर्ल्स विल बी गर्ल्स (2024), कॅक्टस पिअर्स (2025), शेप ऑफ मोमो (2026) आणि लिटल थॉमस (2026) यांसारख्या अनेक उत्तमोत्तम चित्रपटांच्या प्रवासात योगदान दिले आहे.  एनएफडीसीने 21 प्रादेशिक भाषांमधील 300 हून अधिक चित्रपटांना आर्थिक सहाय्य दिले असून, त्यापैकी अनेकांना राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर मान्यता मिळाली आहे.

आता 'वेव्हज फिल्म बाजार' या व्यापक नावाखाली कार्यरत असलेल्या या व्यासपीठाने, दक्षिण आशियायी चित्रपटाला आंतरराष्ट्रीय बाजारपेठा आणि प्रेक्षकांशी जोडत आपला परिप्रेक्ष्य विस्तारला आहे. यातील अनेक उपक्रम चित्रपट निर्मात्यांना निर्मितीच्या विविध टप्प्यांवर उद्योग सहकार्य, मार्गदर्शन, वित्तपुरवठा आणि वितरणाच्या संधींद्वारे साहाय्य करतात.

 आपल्या प्रवासाची दोन दशके साजरी करत, वेव्हज फिल्म बाजारच्या  विसाव्या आवृत्तीचा उद्देश सृजनशील सहकार्याला प्रोत्साहन देत, उदयोन्मुख प्रतिभेला पाठिंबा देऊन, आंतरराष्ट्रीय स्तरावर भारतीय चित्रपटांसाठी नवीन संधी निर्माण करून जागतिक चित्रपट परिसंस्थेमध्ये भारताचे स्थान अधिक सशक्त करणे हा आहे.

***

शैलेश पाटील/संपदा पाटगावकर/परशुराम कोर

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


Great films resonate through passionate voices. Share your love for cinema with #IFFI2026 and #StoriesWithoutBorders. Tag us @pibindia on Instagram and @PIB_India on X, and we will help amplify your festival moments!

For accredited journalists, critics, bloggers, and vloggers seeking 1-on-1 interviews with filmmakers and festival juries, write to us at:
iffi.mediadesk@pib.gov.in with the subject line: Take One with PIB.


Official Release ID: 2336683
•
Media Centre: Goa
•
Festival Dates: Nov 20 – 28, 2026