Posted On:
14 NOV 2026 9:30PM by PIB Mumbai
नवी दिल्ली: 14 नोव्हेंबर 2026
भारतीय क्रिकेटसाठी विशेष दिवस अशा शब्दात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 19 वर्षांखालील पुरुषांच्या आशिया चषक स्पर्धा 2026 चे विजेतेपद पटकवून युवा क्रिकेटपटूंनी केलेल्या प्रभावी कामगिरीबद्दल अभिमानाची भावना व्यक्त केली आहे.
त्यांचे यश अनेक तरुणांना प्रेरणा देईल, असे नमूद करत पंतप्रधानांनी या संघाला त्यांच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
पंतप्रधान 'एक्स' वरील पोस्टमध्ये म्हणतात:
भारतीय क्रिकेटसाठी अत्यंत विशेष दिवस!
आजच्या प्रभावी कामगिरीबद्दल आणि 'पुरुष U-19 आशिया चषक 2026' जिंकल्याबद्दल आमच्या युवा क्रिकेटपटूंचा अत्यंत अभिमान वाटतो. त्यांचे हे यश अनेक तरुण खेळाडूंसाठी प्रेरणादायी ठरेल.
या संघाला त्याच्या पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा!
***
शिल्पा पोफळे/मंजिरी गानू/परशुराम कोर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com