Posted On:
13 NOV 2026 12:35PM by PIB Mumbai
औषध विभागांतर्गत असलेल्या नॅशनल फार्मास्युटिकल प्राइसिंग अथॉरिटीने 137 नॉन-शेड्यूल्ड नियंत्रणाबाहेर असलेल्या कर्करोगविरोधी औषधांच्या बाबतीत ट्रेड मार्जिन रॅशनलायझेशनच्या अंमलबजावणीवर कठोरे लक्ष ठेवण्याचे निर्देश दिले आहेत. यासंदर्भातील अधिसूचना 17 ऑक्टोबर 2026 रोजी राजपत्रित आदेशाद्वारे जारी करण्यात आली असून, सुधारित किमती 9 नोव्हेंबर 2026 पासून लागू झाल्या आहेत.
कंपन्यांकडून 11 नोव्हेंबर 2026 पर्यंत प्राप्त झालेल्या माहितीच्या आधारे तयार केलेली सुधारित किमतींची यादी एनपीपीएच्या वेबसाइटवर आणि फार्मा सही दाम ॲप/पोर्टलवर उपलब्ध आहे. सर्व उत्पादक, किरकोळ विक्रेते, वितरक, स्टॉकिस्ट, रुग्णालये आणि वैद्यकीय संस्थांना या सुधारित किमतींचे पालन करण्याचे आणि अद्ययावत किमतींची यादी आपापल्या परिसरात तसेच वेबसाइटवर ठळकपणे प्रदर्शित करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
राज्य औषध नियंत्रकांनी नियमांचे पालन सुनिश्चित करावे आणि रुग्णांच्या हिताचे रक्षण करावे:
राज्य औषध नियंत्रकांना, उत्पादक, वितरक, रुग्णालये आणि वैद्यकीय संस्थांकडून नियमांचे पालन होत आहे की नाही, यावर त्यांनी कडक लक्ष ठेवावे. असे निर्देश देण्यात आले आहेत. सुधारित कमाल किरकोळ किमतींचा लाभ रुग्णांपर्यंत पोहोचत असल्याची खात्री करणे आवश्यक आहे. नियमांचे उल्लंघन केल्यास, ड्रग्ज आदेश डीपीसीओ , 2013 तरतुदींनुसार अधिक किंमत आकारल्याप्रकरणी कारवाई केली जाऊ शकते.
औषधांच्या जास्तीच्या किमती, तुटवडा किंवा औषधे उपलब्ध नसण्याबाबतच्या तक्रारी फार्मा सही दाम ॲप/पोर्टलद्वारे, एनपीपीएच्या हेल्पलाइन क्रमांकावर (1800-111-255) किंवा ईमेलद्वारे (monitoring-nppa[at]gov[dot]in) नोंदवता येतील. राज्य औषध नियंत्रकांना 16 नोव्हेंबर 2026 पर्यंत केलेल्या कार्यवाहीचा अहवाल एनपीपीएकडे सादर करण्यास सांगण्यात आले आहे.
https://t.co/B9mEk0l7X7
***
Nikhil Fulluke / Rajesh Shirbhate / Madhura Nerurkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai