पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

चार दिवसीय छठ महापर्वाच्या प्रारंभानिमित्त पंतप्रधानांनी देशाला दिल्या हार्दिक शुभेच्छा

Posted On: 13 NOV 2026 9:21AM by PIB Mumbai

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज श्रद्धा आणि सूर्योपासनेला समर्पित असलेल्या चार दिवसीय पवित्र उत्सव, छठ महापर्वाच्या प्रारंभानिमित्त देशभरातील नागरिकांना हार्दिक शुभेच्छा दिल्या.

पंतप्रधानांनी आपल्या ‘एक्स’ हॅन्डलवर सामायिक केले आहे:

"लोकभावना आणि सूर्यपूजेचा सण असलेल्या चार दिवसांच्या पवित्र छठ उत्सवाच्या प्रारंभानिमित्त सर्व देशवासियांना हार्दिक शुभेच्छा. आज नहाय-खाय आहे. व्रत करणाऱ्या सर्व लोकांना माझा नमस्कार. सर्वांना छठी मातेचा आशीर्वाद मिळो, हीच  कामना!!”

***

Nikhil Fulluke / Sampada Patggaonkar / Madhura Nerurkar
 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2335802) अभ्यागत कक्ष : 11