Posted On:
10 NOV 2026 9:16AM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 10 नोव्हेंबर 2026
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज नूतन वर्षाच्या मंगलमय प्रसंगानिमीत्त शुभेच्छा दिल्या आहेत. ही नवी सुरुवात प्रत्येकाच्या जीवनात आनंद, शांती, समृद्धी आणि कल्याणाची नवी आशा घेऊन येवो, अशी सदिच्छा त्यांनी व्यक्त केली आहे.
प्रत्येकाचे जीवन उत्तम आरोग्य, आनंद आणि उत्साहाने भारलेले राहो, अशी प्रार्थनाही पंतप्रधानांनी केली आहे.
यासंदर्भात पंतप्रधानांनी ‘एक्स’वर सामायिक केलेला संदेश:
"नूतन वर्षाभिनंदन !!!
नववर्षाची ही पवित्र सुरुवात आपल्या सर्वांच्या जीवनात सुख, शांती, समृद्धी आणि कल्याणाची नवी आशा घेऊन येवो. सर्वांचे जीवन उत्तम आरोग्य, आनंद आणि उत्साहाने भारलेले राहो, याच मनःपूर्वक शुभेच्छा !"
* * *
नितीन फुल्लुके/तुषार पवार/दर्शना राणे
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai