पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

गोवर्धन पूजेनिमित्त पंतप्रधानांनी देशवासीयांना दिल्या शुभेच्छा


भगवान श्रीकृष्णाला वंदन करणारे संस्कृत सुभाषितही पंतप्रधानांनी केले सामायिक

Posted On: 10 NOV 2026 9:13AM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 10 नोव्‍हेंबर 2026

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज गोवर्धन पूजेच्या या पवित्र सणाच्या देशवासीयांना शुभेच्छा दिल्या आहेत. हा पवित्र सण सर्वांचे जीवन नवी ऊर्जा आणि नव्या उत्साहाने भारून टाको, तसेच प्रत्येकाच्या सुख, सौभाग्य आणि समृद्धीत वृद्धी होवो, अशी मंगलकामनाही त्यांनी व्यक्त केली आहे. यासोबतच गोवर्धन पर्वत उचलणाऱ्या भगवान श्रीकृष्णाला वंदन करणारे एक संस्कृत सुभाषितही त्यांनी सामायिक केले आहे.

यासंदर्भात पंतप्रधानांनी ‘एक्स’ वर सामायिक केलेला संदेश, 

"सर्व देशवासीयांना गोवर्धन पूजेच्या खूप खूप शुभेच्छा. हा पवित्र सण आपल्या सर्वांच्या जीवनात नवीन ऊर्जा आणि नवीन उत्साह घेऊन येवो. सर्वांच्या सुख, सौभाग्य आणि समृद्धीत वाढ होवो, हीच मंगलकामना.

आभीरनगरीप्राणप्रियं सत्यपराक्रमम् ।

स्वभृत्यभयभेत्तारं गोवर्धनधरं भजे ॥"

ब्रजच्या लोकांना अत्यंत प्रिय असलेले, सत्य पराक्रमी आणि आपल्या भक्तांच्या भीतीचा नाश करणाऱ्या गोवर्धनधारी भगवान श्रीकृष्णाला मी वंदन करतो.

 

* * *

नितीन फुल्लुके/तुषार पवार/दर्शना राणे

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2334607) अभ्यागत कक्ष : 19