Posted On:
07 NOV 2026 6:50PM by PIB Mumbai
नवी दिल्ली 07 नोव्हेंबर 2026
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी दिवाळीच्या पूर्वसंध्येला सर्व देशवासियांना शुभेच्छा दिल्या आहेत.
शुभेच्छा संदेशात राष्ट्रपती म्हणतात, “दिवाळीच्या मंगल प्रसंगी भारतात तसेच परदेशात स्थायिक असलेल्या सर्व भारतीयांना माझ्या मनःपूर्वक शुभेच्छा.
रावणावर विजय मिळवून भगवान श्रीराम अयोध्येला परत आल्यानंतर आनंदोत्सव साजरा करण्यात आला. भगवान श्रीरामांनी उजळलेल्या दीपमाळा पाहिल्या. यातूनच दिवाळीचे सांस्कृतिक आणि भक्तीभावात्मक महत्त्व दिसून येते. हा सण राम राज्याच्या पवित्र आरंभाचे प्रतीक आहे.
दिवाळीचा हा सण वाईट प्रवृत्तींवर सद्गुणांच्या विजयाचे प्रतीक आहे. हा उत्सव दुःखाचा अंत आणि आनंदी तसेच समृद्ध जीवनाची सुरुवात दर्शवतो. या प्रसंगी, शुभ आरंभासाठी आणि कल्याणासाठी भगवान गणेशाची पूजा करतात तर समृद्धीसाठी महालक्ष्मी मातेची आराधना करतात. सर्वांच्या आनंदासाठी प्रार्थना केल्या जातात.
मी आपल्या देशातील प्रत्येक नागरिकाला उत्तम आरोग्य, आनंद आणि समृद्धी मिळो अशी सदिच्छा व्यक्त करते. आपण आपल्या पर्यावरणाचे संवर्धन करूया, सामंजस्याने जीवन जगूया आणि भारतीय मूल्यांच्या मार्गदर्शनाखाली आपले देशभक्त तरुण विकसित भारताच्या उभारणीमध्ये उत्साहाने योगदान देवोत हीच प्रार्थना.”
***
सुषमा काणे/संजना चिटणीस/परशुराम कोर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com