पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

पंतप्रधानांनी सर्व नागरिकांना धनत्रयोदशीच्या दिल्या शुभेच्छा


या शुभ प्रसंगी त्यांनी एक संस्कृत सुभाषितही सामायिक केले

Posted On: 06 NOV 2026 10:08AM by PIB Mumbai

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्व नागरिकांना धनत्रयोदशीच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

पंतप्रधानांनी प्रार्थना केली आहे की, भगवान धन्वंतरी यांचा दिव्य आशीर्वाद प्रत्येकाच्या जीवनात आनंद, शांती आणि उत्तम आरोग्य घेऊन येवो. प्रत्येक कुटुंबाला चिरंतन आनंद आणि उत्साहाचा लाभ मिळो, अशी मनोकामना त्यांनी केली आहे.

पंतप्रधान मोदी यांनी भगवान धन्वंतरी यांची प्रार्थना केली आणि सर्वांच्या कल्याणासाठी आशीर्वाद मागितले.

संस्कृत सुभाषित सामायिक करताना, मोदी यांनी X वर लिहिले आहे:

"सर्व देशवासियांना धनत्रयोदशीच्या शुभेच्छा. भगवान धन्वंतरींच्या दिव्य कृपेने प्रत्येकाचे जीवन सुख, शांती आणि उत्तम आरोग्याने उजळून निघो. प्रत्येक कुटुंबात आनंद आणि सुखाचा शाश्वत दिवा तेवत राहो, हीच मनोकामना.

नमामि धन्वन्तरिमादिदेवं सुरासुरैर्वन्दितपादपद्मम्।

लोके जरारुग्भयमृत्युनाशं दातारमीशं विविधौषधीनाम्॥”

***

NehaKulkarni / RajashreeAgashe / DineshYadav

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2333452) अभ्यागत कक्ष : 10