Posted On:
05 NOV 2026 9:01AM by PIB Mumbai
खाण मंत्रालयाने गोवा येथे 5-6 नोव्हेंबर 2026 रोजी खनिकर्म मंत्र्यांची चौथी परिषद आयोजित केली आहे. या परिषदेत विविध राज्यांचे खनिकर्म मंत्री आणि केंद्र आणि राज्य सरकारचे वरिष्ठ अधिकारी सहभागी होतील.
ही दोन दिवसीय परिषद, खाण क्षेत्रातील विविध पैलूंवर राज्यांचे खाण मंत्री आणि वरिष्ठ अधिकारी यांच्यात संवाद घडवून आणण्यासाठी तसेच विचारांची देवाणघेवाण करण्यासाठी महत्त्वाचे व्यासपीठ उपलब्ध करून देईल.
या परिषदेच्या निमित्ताने राज्यांना त्यांचे अनुभव, उपक्रम आणि सर्वोत्तम पद्धती सामायिक करण्यासाठी प्रोत्साहन मिळेल, तसेच या क्षेत्रातील प्रगती, संधी आणि आव्हाने यावर चर्चा करण्याची संधी मिळेल.
विविध राज्यांच्या प्रतिनिधींचा सहभाग परस्पर संबंध अधिक दृढ करेल आणि भारताच्या खाण क्षेत्राची भविष्यातील वाढ आणि विकासावर चर्चा करण्याची संधी उपलब्ध करून देईल.
ही परिषद देशाच्या खाण क्षेत्राची सर्वांगीण प्रगती आणि 'विकसित भारता'च्या उद्दिष्टपूर्ती मध्ये योगदान देण्यासाठी, खाण मंत्रालयाचा राज्य सरकारांबरोबर असलेला निरंतर सहभाग दर्शवते.
***
NehaKulkarni / RajashreeAgashe / DineshYadav
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai