Posted On:
02 NOV 2026 3:42PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 2 नोव्हेंबर 2026
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांचा, भारताच्या सौरऊर्जा प्रवासामुळे नव्या संधी कशा निर्माण होत आहेत, याविषयीचा लेख सामायिक केला. पीएम सूर्य घर आणि पीएम कुसुम यांसारख्या उपक्रमांमुळे भारतातील सौरऊर्जेच्या वापरात झालेली वाढ या लेखात अधोरेखित करण्यात आली आहे, असे पंतप्रधानांनी नमूद केले .
भारत 500 गिगावॅट नवीकरणीय ऊर्जेचे उद्दिष्ट गाठण्याच्या दिशेने वाटचाल करत असताना, सौरऊर्जेवर चालणारी शेती, ऊर्जा साठवणूक, उत्पादन क्षेत्र आणि हरित रोजगार अशा क्षेत्रांमध्ये भविष्यात कोणत्या संधी निर्माण होऊ शकतात, याचाही या लेखात आढावा घेण्यात आला आहे, असे पंतप्रधानांनी पुढे म्हटले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘एक्स’वर पुढील पोस्ट केली आहे:
“भारताच्या सौरऊर्जा प्रवासामुळे नव्या संधींची दारे खुली होत आहेत!
पीएम सूर्य घर आणि पीएम कुसुम यांसारख्या उपक्रमांमुळे भारतातील सौरऊर्जेच्या वापरात झालेल्या वाढीविषयी केंद्रीय मंत्री @JoshiPralhad यांनी लिहिले आहे.
भारत 500 गिगावॅट नवीकरणीय ऊर्जेचे उद्दिष्ट गाठण्याच्या दिशेने वाटचाल करत असताना, सौरऊर्जेवर चालणारी शेती, ऊर्जा साठवणूक, उत्पादन क्षेत्र आणि हरित रोजगार अशा क्षेत्रांमध्ये भविष्यात कोणत्या संधी निर्माण होऊ शकतात, याचाही त्यांनी आढावा घेतला आहे.”
नितीन फुल्लुके/निखिलेश चित्रे/प्रिती मालंडकर