पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

पंतप्रधानांनी केरळप्पिरवी निमित्त केरळमच्या जनतेला शुभेच्छा दिल्या.

Posted On: 01 NOV 2026 12:39PM by PIB Mumbai

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज केरळप्पिरवी निमित्त केरळममधील जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत. हा विशेष दिवस केरळममधील समृद्ध परंपरा आणि असाधारण सांस्कृतिक वैशिष्ट्यांचा उत्सव असल्याचे त्यांनी म्हटले आहे. नैसर्गिक सौंदर्य आणि समृद्ध सांस्कृतिक वारसा लाभलेल्या या राज्याला देशाच्या इतिहासात नेहमीच महत्त्वाचे स्थान राहिले आहे, असे पंतप्रधानांनी नमूद केले.

केरळची सर्वात मोठी ताकद म्हणजे तेथील जनता. त्यांची समर्पणभावना आणि उत्कृष्टतेप्रति असलेली बांधिलकी यामुळे भारताच्या सीमा ओलांडूनही त्यांना प्रशंसा मिळाली आहे. आरोग्यसेवा, शिक्षण, उद्योजकता, विज्ञान अशा विविध क्षेत्रांतील केरळच्या जनतेच्या कामगिरीमुळे देशाचा गौरव वाढला आहे, असे पंतप्रधानांनी म्हटले आहे.

पंतप्रधानांनी एक्सवरील संदेशात म्हटले आहे :

केरळममधील माझ्या बंधू-भगिनींना केरळप्पिरवीच्या हार्दिक शुभेच्छा!

हा विशेष दिवस केरळमच्या समृद्ध परंपरा आणि असाधारण सांस्कृतिक वैशिष्ट्यांचा उत्सव आहे. विपुल नैसर्गिक सौंदर्य आणि समृद्ध सांस्कृतिक वारसा लाभलेल्या या राज्याला आपल्या देशाच्या इतिहासात नेहमीच मानाचे स्थान राहिले आहे.

केरळमची सर्वात मोठी ताकद म्हणजे तेथील जनता. त्यांची समर्पणभावना आणि उत्कृष्टतेप्रति असलेली बांधिलकी यामुळे भारताच्या सीमा ओलांडूनही त्यांना प्रशंसा मिळाली आहे. आरोग्यसेवा, शिक्षण, उद्योजकता, विज्ञान आणि इतर अनेक क्षेत्रांतील केरळमच्या जनतेच्या उल्लेखनीय कामगिरीमुळे देशाचा गौरव वाढला आहे.

येत्या काळात केरळममधील प्रत्येक नागरिकासाठी नव्या संधी, अधिक समृद्धी आणि निरंतर प्रगतीचे पर्व घेऊन येवो, अशी मी आशा व्यक्त करतो.

***

यश राणे/ नितीन गायकवाड/परशुराम कोर

*** 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2331169) अभ्यागत कक्ष : 22