Posted On:
30 OCT 2026 7:38PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 30 ऑक्टोबर 2026
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू 31 ऑक्टोबर ते 1 नोव्हेंबर 2026 या कालावधीत महाराष्ट्र आणि हरियाणाला भेट देणार आहेत.
31 ऑक्टोबर रोजी राष्ट्रपती महाराष्ट्रातील नाशिक इथे सिंहस्थ महाकुंभच्या ध्वजस्तंभ पूजन, ध्वज पूजन आणि ध्वजारोहण सोहळ्याला उपस्थित राहतील. यानिमित्ताने होणाऱ्या कार्यक्रमालाही त्या संबोधित करतील.
1 नोव्हेंबर रोजी राष्ट्रपती कुरुक्षेत्र इथे हरियाणा राज्याच्या स्थापनेच्या 60 व्या वर्षानिमित्त आयोजित हीरक महोत्सव सोहळ्याला उपस्थित राहतील. तसेच त्या कुरुक्षेत्र इथल्या गुरुकुलमध्ये स्वामी श्रद्धानंद यांच्या बलिदानाच्या शताब्दीनिमित्त आयोजित वार्षिक महोत्सवालाही उपस्थित राहणार आहेत.
सुषमा काणे/तुषार पवार/प्रिती मालंडकर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai