Posted On:
29 OCT 2026 6:38PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 29 ऑक्टोबर 2026
भारतीय रेल्वे येत्या 2 ते 31 ऑक्टोबर 2026 या कालावधीत राबवल्या जात असलेल्या विशेष मोहीम 6 मध्ये सक्रियपणे सहभागी आहे. येत्या 31 ऑक्टोबर रोजी या मोहिमेचा समारोप होणार आहे. त्याआधीच भारतीय रेल्वेने आपली अनेक महत्त्वाची उद्दिष्टे पूर्ण केली आहेत. ही प्रलंबित प्रकरणे निकाली काढण्यासाठी विशेष मोहीम (SCDPM-6) आहे. या मोहिमेअंतर्गत स्वच्छता, भंगाराची विल्हेवाट, ई-कचरा व्यवस्थापन आणि प्रशासकीय प्रक्रियांच्या सुलभीकरणाच्या बाबतीत रेल्वेने मोठे यश साध्य केले आहे.
या मोहिमेअंतर्गत रेल्वेच्या वतीने दि. 22 ऑक्टोबर 2026 रोजी देशभरातील 5,884 स्थानकांवर रेल जनसंवाद या उपक्रमाचे आयोजन केले गेले होते. या उपक्रमाच्या माध्यमातून प्रवाशांशी थेट संवाद साधून स्वच्छता, त्यांना मिळणाऱ्या सोयी सुविधा आणि सेवांबद्दल प्रवाशांचे अभिप्राय आणि सूचना संकलित करण्याच्या उद्देशाने या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
या मोहिमेअंतर्गत रेल्वे मंडळाचे अध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी सतीश कुमार यांनी नवी दिल्लीत प्रवाशांशी चर्चा केली. तर प्रशासकीय सुधारणा आणि सार्वजनिक तक्रार विभागाचे (DARPG) सचिव मुंबईत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस इथे झालेल्या कार्यक्रमात सहभागी झाले होते. या संवादामुळे रेल्वेला स्थानिक पातळीवरील प्रश्न समजून घेण्याची आणि प्रवाशांच्या सोयी सुविधांच्या मुद्यांवर तातडीने योग्य ती कार्यवाही करण्याची संधी उपलब्ध झाली.

येत्या 31 ऑक्टोबर रोजी विशेष मोहीम 6 चा समारोप होणार आहे. मात्र रेल्वेच्या वतीने, या मोहिमेदरम्यान साध्य केलेल्या यशाला ठोस स्वरुप मिळवून देण्यावर, तसेच या मोहीमेदरम्यान स्वच्छता, संसाधनांचा योग्य वापर, प्रलंबित कामे निर्धारीत पूर्ण करणे आणि प्रवाशांसाठीच्या सोयी सुविधांमध्ये सुधारणा करण्यासाठी अंगिकारलेल्या सर्वोत्तम कार्यपद्धतींचा अवलंब यापुढेही कायम ठेवण्यावर भर दिला जाणार आहे.
* * *
सुषमा काणे/तुषार पवार/दर्शना राणे
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai