मंत्रिमंडळ
azadi ka amrit mahotsav

केंद्रीय कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता आणि निवृत्तीवेतनधारकांना महागाई दिलासा देण्याच्या प्रस्तावाला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी

Posted On: 28 OCT 2026 4:26PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 28 ऑक्‍टोबर 2026 

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत, भाववाढीची भरपाई करण्यासाठी केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांना महागाई भत्याचा अतिरिक्त हप्ता तर निवृत्तीवेतन धारकांना महागाई दिलासा देण्याच्या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली असून, तो 01.07.2026 पासून लागू होणार आहे. सध्या, मूळ वेतन/निवृत्तीवेतनाच्या 60 टक्के असलेल्या या भत्यात आणखी तीन टक्के वाढ मंजूर करण्यात आली आहे.

महागाई भत्ता आणि महागाई दिलासा या दोन्हींमधील वाढीमुळे सरकारी तिजोरीवर दरवर्षी एकूण 10,016.10 कोटी रुपयांचा अतिरिक्त आर्थिक भार पडणार आहे. या निर्णयाचा लाभ केंद्र सरकारच्या सुमारे 48.54 लाख कर्मचारी आणि 68.71 लाख निवृत्तीवेतनधारकांना मिळणार आहे.

ही वाढ, सातव्या केंद्रीय वेतन आयोगाच्या शिफारशींवर आधारित आणि मान्यताप्राप्त सूत्रानुसार  करण्यात आली आहे.

 

* * *

निलिमा चितळे/राधिका अघोर/दर्शना राणे

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2329530) अभ्यागत कक्ष : 118