Posted On:
26 OCT 2026 4:26PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 26 ऑक्टोबर 2026
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इंग्लंडच्या क्रिकेट संघाचे माजी कर्णधार केविन पीटरसन यांचा लेख सामायिक केला आहे.
या लेखात केविन पीटरसन यांनी भारताचे वाढते क्रीडा सामर्थ्य, महिला क्रिकेटचा उत्कर्ष आणि पायाभूत सेवासुविधा आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील देशाची प्रगती अधोरेखित केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाने देशाचा चेहरामोहरा बदलण्यासाठी कशाप्रकारे योगदान दिले आहे हे सांगतानाच वन्यजीव संवर्धन आणि नैसर्गिक वारशाचे संवर्धन करण्यासाठी केलेले प्रयत्न नमूद केले आहेत.
पंतप्रधान कार्यालयाने एक्स समाजमाध्यमावरील पोस्ट मध्ये लिहिले आहे:
भारत, क्रीडा, तंत्रज्ञान आणि वन्यजीव संवर्धन क्षेत्रात आपला ठसा उमटवत आहे!
@KP24 यांनी भारताचे वाढते क्रीडा सामर्थ्य, महिला क्रिकेटचा उत्कर्ष आणि पायाभूत सेवासुविधा आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील देशाची प्रगती अधोरेखित केली आहे. भारताचा चेहरामोहरा बदलण्यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाचे मोठे योगदान असून त्याचबरोबर वन्यजीव संरक्षण आणि नैसर्गिक वारसा जतन करण्यासाठीही त्यांनी प्रयत्न केले आहेत असे त्यांनी म्हटले आहे.
https://www.hindustantimes.com/opinion/an-aspiring-achieving-assertive-new-india-101792953158240.html
निलीमा चितळे/भक्ती सोनटक्के/प्रिती मालंडकर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai