Posted On:
23 OCT 2026 6:58PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 23 ऑक्टोबर 2026
आशियाई पॅरा क्रीडा स्पर्धेत महिला रिकर्व्ह दुहेरी प्रकारात भारताचे पहिलेवहिले पदक जिंकून ऐतिहासिक रौप्यपदक मिळवल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज भावना चौधरी आणि पूजा जात्यान यांचे अभिनंदन केले.
या दोघींच्या यशामुळे तिरंदाजी क्षेत्रात पुढे येऊ इच्छिणाऱ्या अनेकांना प्रेरणा मिळेल, असे पंतप्रधान मोदी यांनी म्हटले.
पंतप्रधान कार्यालयाने ‘एक्स’वरील पोस्टमध्ये म्हटले आहे,
“आशियाई पॅरा क्रीडा स्पर्धेत भावना चौधरी आणि पूजा जात्यान यांनी ऐतिहासिक रौप्यपदक जिंकले आहे!
या स्पर्धेत महिला रिकर्व्ह दुहेरी प्रकारात भारताचे पहिलेवहिले पदक जिंकल्याबद्दल या जोडीचे अभिनंदन. त्यांच्या यशामुळे तिरंदाजी क्षेत्रात पुढे येऊ इच्छिणाऱ्या अनेकांना प्रेरणा मिळेल. : पंतप्रधान @narendramodi”
* * *
राधिका अघोर/निखिलेश चित्रे/दर्शना राणे
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai